Rahul Gandhi Watch Phule Movie: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच 'फुले' हा चित्रपट पाहिला हा चित्रपट ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. राहुल गांधी यांनी बिहारच्या पटणा येथील इनॉक्स मॉलमध्ये हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, "बिहार दौऱ्यात आज पटणा येथील इनॉक्स मॉलमध्ये प्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्यांसह 'फुले' चित्रपट पाहून भावुक झालो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन आजही आपल्या समाज आणि देशाला मार्गदर्शन करत आहे."
'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी काही वाद निर्माण झाले होते. चित्रपटावर आरोप करण्यात आला होता की, त्यामध्ये ब्राह्मण समाजाबद्दल चुकीची माहिती दर्शवली आहे. या कारणास्तव, सेंसर बोर्डाने चित्रपटात काही बदल करण्याची मागणी केली होती, ज्यामध्ये जातिव्यवस्थेवरील व्हॉइसओव्हर काढून टाकणे आणि काही संवाद व दृश्यांमध्ये बदल करण्याचा समावेश होता.
यांच्या या चित्रपट पाहण्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी त्यांच्या या कृतीचे कौतुक केले करत ते सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर विचार आणि एकात्मता ठेवत असल्याचे बोलले जात आहे. तर, काहींनी त्यांना ट्रोल करत, त्यांनी झोपडपट्टी सारख्या भागात जाऊन प्रत्यक्ष जीवन पाहणे अधिक उपयुक्त ठरले असते बोलले जात आहे.
'' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, त्याला समीक्षकांकडून मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही समीक्षकांनी चित्रपटाच्या विषयवस्तूचे कौतुक केले आहे, तर काहींनी पटकथेच्या सादरीकरणावर टीका केली आहे. तथापि, चित्रपटाने ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक सुधारणा कार्याला उजागर करण्याचा प्रयत्न केला आहे.