India Bangladesh Dispute : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघ्या संघर्ष चालू असताना दुसरीकडे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. भारत सीमेवरून काही लोकांना बांगलादेशच्या सीमेत पाठवत आहे, असा आरोप करत बांगलादेशने सीमेवर गस्त वाढवली आहे. याच कारणामुळे सध्या बांगलादेशने नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय नागरिकत्त्व नसलेल्या लोकांना भारताकडून बांगलादेशमध्ये पाठवले जात असल्याचा दावा बांगलादेशने केलाय. सिलहट, मौलवीबाजार, खगराछारी, कुरीग्राम, सतखीरा, सुंदरबन या वेगवेगळ्या सहा सीमाभागांतून एकूण 340 बांगलादेशमध्ये जबरदस्तीने पाठवण्यात आल्याचं बांगलादेशने म्हटलंय. याच कारणामुळे दोन्ही देशांतील संबंध ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या करावायांतून फक्त बांगलादेशी नागरिकच नव्हे तर रोहिंग्या शरणार्थी, तसेच अवैध पद्धतीने भारतात प्रवेश करणाऱ्यांनाही बांगलादेशमध्ये पाठवले जात आहे, असा बांगलादेशचा दावा आहे. गेल्या काही दिवसांत बॉर्डर गार्ड्स बांगलादेशने (बीजीबी) 262 लोकांना पकडले आहे. यातील 223 नागरिक हे बांगलादेशी आहेत. तर 19 जण रोहिंग्या आहेत. अन्य लोक नेमके कोणत्या देशाचे आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही.
सीमेवर होत असलेल्या या सर्व कथित प्रकारामुळे बांगलादेश सरकारने 9 मे रोजी भारताला एक पत्र पाठवले आहे. लोकांना बांगलादेशमध्ये पाठवण्याच्या या घनटांना लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून बांगलादेशने केले आहे. एखादी व्यक्ती खरंच बांगलादेशी असेल तर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या व्यक्तीला बांगलादेशमध्ये परत घेतले जाईल. मात्र अशा पद्धतीने जबरदस्तीने होत असलेली घुसखोरी चुकीची आहे, असे बांगलादेशने म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारताने बांगलादेशातील या कथित घुसखोरीला आळा न घातल्यास बांगलादेशही लोकांना भारतीय प्रदेशात पाठवण्यावर विचार करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या कथित घटनांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध प्रभावित होण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या गृहमंत्रालयामार्फत बांगलादेशमध्ये अवैध पद्धतीने राहणाऱ्या भारतीय नागरिकांची सूची तयार केली जात आहे. दोन्ही देशांतील संबंधांमध्ये सुधारणा न झाल्यास बांगलादेश प्रत्युत्तर म्हणून काही कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे भारत-बांगलादेशच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. तसेच या दोन्ही देशांचे संबंधही बिघडू शकतात.