मूर्ती लहान पण किर्ती महान या उक्तीप्रमाणे 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. क्रिकेट विश्वात त्याने आपल्या खेळीने खळबळ उडवून दिली आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. इतकंच काय तर गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने फ्कत 35 चेंडूत वादळी शतक ठोकलं. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचे अनेक चाहते झाले आहेत. वैभव सूर्यवंशी आयपीएल मेगा लिलावात पहिल्यांदा चर्चेत आला होता. राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी 1.1 कोटी रुपये मोजली होती. इतकंच काय तर पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. वैभव सूर्यवंशी क्रिकेटव्यतिरिक्त त्याचं वय आणि शिक्षणाबाबत चर्चेत आहे. असं असताना वैभव सूर्यवंशी सीबीएसई दहावीच्या परीक्षेला नापास झाला म्हणून अफवा उडाली आहे. मात्र त्यात काहीच तथ्य नाही. कारण वैभव सूर्यवंशी यंदा दहावीला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? वैभव सूर्यवंसी कोणत्या शाळेत आहे आणि त्याची फी किती आहे? चला जाणून घ्या
वैभव सूर्यवंशी बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावातील आहे. त्याने कमी वयातच क्रिकेटविश्वात नावलौकीक मिळवला. वैभव सूर्यवंशी समस्तीपूर जिल्ह्यातील मोडेस्टी शाळेचा विद्यार्थी आहे. यंदा त्याचं दहावीचं वर्ष आहे. म्हणजेच 2026 मध्ये दहावीची परीक्षा देणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, मोडेस्टी शाळेची प्रवेश फी 5000 रुपये आहे. यासह मासिक फी देखील भरावी लागते. वैभव रोज सकाळी उठून अभ्यास करतो. वैभवच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, वैभवच्या दिवसाची सुरुवात ट्यूशनमधून होते. यासाठी वेगळी फी मोजावी लागते.
वैभव सूर्यवंशी क्रिकेटप्रमाणे अभ्यासतही हुशार आहे. त्याने क्रिकेटसह अभ्यासवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. सध्या नववी पास करून दहावीत पोहोचला आहे. त्यामुळे यंदा बोर्डाची परीक्षा असल्याने वैभवला क्रिकेटसोबत अभ्यास जोमाने करावा लागणार आहे. त्यामुळे आता तालमेल बसवण्यात त्याची कसोटी लागणार आहे. दरम्यान, कुटुंबियांनी अभ्यासाठी वैभववर जास्त दबाव टाकलेला नाही. कारण त्याला क्रिकेट सरावासाठी अधिकचा वेळ द्यावा लागतो.