Operation Sindoor : पाकचा तो दावा फुसका, शरीफ आणि मुनीरला तोंड लपवण्याची वेळ, पाकिस्तानी पत्रकाराकडून मोठी पोलखोल
GH News May 17, 2025 05:06 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणाव वाढला. 6-7 मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पाकला मोठा हादरा दिला. त्यानंतर लागलीच पाकने ड्रोन आणि मिसाईल डागली. भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने ते हवेतच नष्ट केले. उलट कारवाईत भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. नूर यार खान एअरबेससह पाकिस्तानातील 11 हवाईतळ नष्ट केले. सुरुवातीला आम्ही भारताचे मोठे नुकसान केले, आमचे काही एक नुकसान झाले नाही असा दावा करणारे पाकडे आता आमचे खूप मोठे नुकसान झाल्याचे कबुली देत आहेत. तर पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार मोईद मिरजादा यांनी पाकिस्तानच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे.

मिरजादा यांची पाकला चपराक

आपल्या मिसाईल आणि ड्रोनने शत्रू राष्ट्राचे मोठे नुकसान केले, अशा वल्गणा सुरुवातीला पंतप्रधान शाहबाज शरीफ याने केल्या. पाकिस्तान जिंकला, असा पोकळ ढोल त्याने बडवला. पण अवघ्या 8 व्याच दिवशी शरीफला पाकचे भारताने कंबरडे मोडल्याचे मान्य करावे लागले. त्यातच आता ज्येष्ठ पत्रकार मोईद मिरजादा यांनी पाकच्या एकाही मिसाईलने भारताचे नुकसान केले नाही असा दावा केला आहे. या दाव्यासाठी त्यांनी सॅटेलाईज इमेज्सचा पुरावा देऊन पाकच्या कानाखाली सणसणीत जाळ काढला आहे.

काय म्हणाले मिरजादा

नियो टाईम्सच्या आधारे मिरजादा यांनी पाकिस्तानचा खोटा दावा हाणून पाडला. भारताचे नुकसान केल्याचा पाकचा खोटा प्रचार मिरजादा यांनीच उघडा केला. त्याची पोलखोल केली. दोन्ही देशांनी एकमेकांचे खूप नुकसान केल्याचा दावा केला आहे. पण जी सॅटेलाईट छायाचित्र समोर आली आहेत. मॅक्सल टेक्नॉलॉजीच आणि प्लॅनेट लॅबने ही छायाचित्र पुढे आणली आहेत. त्यानुसार, भारताचे मोठे नुकसान झालेले नाही. पाकच्या एकाही मिसाईलने भारतात नुकसान केलेले नाही, हे स्पष्ट होत आहे. तर भारताने ज्या वेगवेगळ्या मिसाईल डागल्या. त्यांनी 24 ठिकाण टार्गेट केली. त्यातील काही पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानातील होती. या मिसाईलने त्यांचे लक्ष्य अचूक भेदले. त्या त्या इमारतींना बरोबर लक्ष्य केले. ब्राम्होस या भारत-रशियन मिसाईलने पण अचूक निशाणा साधला, असे मिरजादा म्हणाले.

भारतीय लष्कराने पत्र परिषदेत सॅटेलाईट फोटोतून पाकिस्तानचे झालेले नुकसान दाखवलेले आहे. पण मिरजादा यांच्या मते, त्यांनी अमेरिकेच्या सॅटेलाईट इमेजवर विश्वास ठेवला आणि त्यात पाकच्या हवाईतळावरील धावपट्टीचे मोठे नुकसान झाल्याचे, एअरबेसचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान काहीच नुकसान झाले नाही असे म्हणतो, तर मग त्यांनी फोटो दाखवावेत असे आवाहन मिरजादा यांनी केले. तर भारताचे आदमपूर एअरबेस उडवल्याचे, नष्ट केल्याचा दावा खोटा असल्याचे मिरजादा म्हणाले. पाकचे मिसाईल कधीच लक्ष्य भेद करत नाही हे अगोदर सुद्धा उघड झाल्याचे मिराजादा म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.