Janki Bodiwala: 'तू सीन सुरु असताना खरच लघवी कर...; दिग्दर्शकाची विचित्र मागणी 'शैतान' फेम जानकी बोडीवालाचा धक्कादायक खुलासा
Saam TV May 17, 2025 07:45 PM

Janki Bodiwala: गुजराती चित्रपट 'वश' आणि त्याच्या हिंदी रिमेक 'शैतान' मधील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जानकी बोडीवालाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या अभिनय प्रवासातील एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. 'वश' चित्रपटातील एका दृश्यात, दिग्दर्शकाने तिला सुरु सीनमध्ये खरच लघवी करण्याची मागणी केली होती, असे तिने उघड केले. या प्रसंगामुळे विचित्र वाटले आणि तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

जानकी बोडीवालाने सांगितले की, 'वश' चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनमध्ये, तिच्या पात्राला घाबरुन पॅन्टमध्ये लघवी करताना दाखवायचे होते. दिग्दर्शकाने या दृश्यात वास्तवता आणण्यासाठी तिला खरच लघवी करण्याची मागणी केली होती. या मागणीमुळे जानकी अस्वस्थ झाली आणि तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. पण नंतर, दिग्दर्शकाने या दृश्याची मांडणी बदलली आणि जानकीने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.

'शैतान' चित्रपटातही हे दृश्य सामाविष्ट करण्यात आले होते, परंतु ते अधिक संवेदनशीलतेने चित्रित करण्यात आले. या दृश्यात, जानकीच्या पात्राला तिच्या वडिलांसमोर लघवी करताना दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे तिची भावनिक स्थिती दिसून येते. जानकीने या दृश्याच्या चित्रिकरणाबद्दल सांगितले की, "हे दृश्य अतिशय संवेदनशील होते आणि ते अत्यंत सौंदर्यपूर्णतेने चित्रित करण्यात आले."

ने '' चित्रपटात तिच्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रशंसा मिळवली आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.