Shahrukh Khan-Rani Mukerji : किंग खानच्या चित्रपटात राणी मुखर्जीची दमदार एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार?
Saam TV May 17, 2025 07:45 PM

बॉलिवूडचा किंग खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'किंग' च्या (King ) शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. 'किंग' चित्रपटात आता बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात राणी मुखर्जी झळकणार आहे.

आता पुन्हा एकदा खूप वर्षांनी खान (Shahrukh Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. या बातमीने चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. चाहते यांना एकत्र पाहण्यासाठी खूपच आतुर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी चित्रपटात सुहानाच्या आईची भूमिका साकारणार आहे. मुखर्जीचा 'किंग' चित्रपटात कॅमिओ असणार आहे. मात्र याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आहे.

'किंग' स्टारकास्ट

शाहरुख खानच्या '' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी हे कलाकार धुमाकूळ घालणार आहेत. 'किंग' हा सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात शाहरुख खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

राणी मुखर्जी-शाहरुख खान

राणी मुखर्जी आणि शाहरुख खान प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या जोडीने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना कायमच भुरळ घालतो. शाहरुख खानचे चाहते किंग चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, किंग' चित्रपट 2026 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.