उर्फी जावेद (Urfi Javed) कायम तिच्या अतरंगी स्टाइलसाठी ओळखली जाते. अलिकडेच तिने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्याला 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'ला जाता न आल्याची खंत व्यक्त केली आहे. उर्फीने आजवर अनेक स्टायलिश लूक केले आहेत. तिशी फॅशन कायमच चर्चेत राहिली आहे. अशात आता उर्फी जावेदचा एक लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'मध्ये (Cannes Film Festival 2025) सहभागी होता आले नसल्याने तिने मुंबईत रेड कार्पेट लूक तयार केला.
उर्फी जावेदचा रेड कार्पेट लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या लूकमध्ये उर्फी खूपच क्युट दिसत आहे. उर्फीने लाल रंगाचा फुला स्टाइल ड्रेस परिधान केलाआहे. तिच्या या अनोख्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने या ड्रेसमध्ये 3D पाकळ्यांचा थर लावला होता. ज्या फुलताना पाहून चाहते वेडे झाले आहेत. तिच्या या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिने स्ट्रॅपलेस हार्ट नेकलाइनसह बरगंडी रंगाच मिनी-ड्रेस परिधान केला होता.
या चमकदार फुलाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. उंच हिल्स, हेअर बन, मिनिमल ज्वेलरी आणि ग्लॉसी मेकअपने तिने हा लूक पूर्ण केला होता. उर्फी जावेदच्या या लूकर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये तिच्या ड्रेसचे कौतुक होत आहे. तर ती खूप छान दिसत असल्याचे बोले जात आहे. उर्फी जावेदच्या या स्पेशल रेड कार्पेट लूकची सोशल मीडियावर सध्या हवा पाहायला मिळत आहे.
उर्फी जावेदने सोशल मीडियावर पोस्ट करून तिचे 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025'मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहीले असल्याचे सांगितले. उर्फी जावेदचा व्हिसा रिजेक्ट झाल्यामुळे ती 'कान्स फिल्म फेस्टीव्हल 2025' भाग घेऊ शकली नाही. उर्फी जावेदने 'बिग बॉस ओटीटी' गाजवले आहे. उर्फीला 'फॉलो कर लो यार' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळवून दिली. उर्फी जावेद एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री आहे.