पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी रेल्वे स्टेशन जवळील मुळा नदीपात्रात २९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. उल्हास शिंगाडे अस बुडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उल्हास शिंगाडे हा तरुण पोहण्यासाठी नदीपात्रात गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
सदरील घटना समजताच पिंपरी चिंचवड मनपाच्या मुख्य अग्निशामक दल रात्री उशिरापर्यंत बचाव करत होते, मात्र अंधार असल्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आले, पुन्हा सकाळी बचाव कार्य सुरूकरून बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आल आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वभाव लढवण्याचे शिवसेनेचे संकेततुम्ही आमच्या सोबत आलात तर युती म्हणून निवडणूक लढवू नाहीतर तुम्ही स्वबळावरची भाषा केली तर आम्ही आम्हीसुद्धा स्वतंत्रपणे भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा इशारा खासदार नरेश मस्के यांनी भाजपला दिला आहे
नवी मुंबई फक्त दिसायला ताजमहाल आहे पण प्रत्यक्ष अनेक समस्या आहेत असा टोला सुद्धा नरेश मस्के यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे
युवा सेनेत जाहीर मेळाव्यात खासदार नरेश मस्के यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी केली अटक, अद्याप २० आरोपी फरारतुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलीसांनी तुळजापूर तालुक्यातील कामठा येथून आरोपी शरद जमदाडे याला अटक केली आहे.
तब्बल दीड महिन्यापासुन फरार असलेल्या शरद जमदाडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण ३६ आरोपी निष्पन्न आहेत.
यातील १६ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.अद्याप २०आरोपी फरार आहेत.
Nandurbar: नंदुरबार शहरात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुफान पाऊसवादळी वाऱ्यामुळे नंदुरबार शहरातील अनेक घरांचे उडाले पत्रे...
वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले भिंती कोसळल्या....
आदिवासी कुटुंबाच अचानक होत्याच नव्हतं झाला घर संसार उघड्यावर...
संसार उपयोगी साहित्य पाण्यात झाले खराब....
एकूण 25 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती...
पडत्या पावसात उघड्यावर बसून रात्र काढण्याची आदिवासी महिलेवर वेळ....
माळीवाडा बंधारहट्टी परिसरात सर्वाधिक नुकसान....
खासदार श्रीकांत शिंदे यांचा टोला उद्धव ठाकरे यांनाआता निर्णय ड्रॉईंगरूम मध्ये बसून घेतले जातं नाहीत तर लोकालोकांमध्ये बसून फिरून बसून घेतले जातात
निर्णय घरात बसून, ऑनलाईन घेत नाही, आम्ही फेसबुक लाईव्ह ने नाही तर फेस टू फेस बसून घेतो
असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे युवा सेनेच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते
आयसिस मॉड्यूल प्रकरणात अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांना अटकराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांना अटक केली
या दोघांना इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आली
मुंबईत आणण्यात आले, जिथे त्यांना न्यायालयात हजर केल जाणार
Mumbai: मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकीमुंबई पोलिस यंत्रणा सतर्क, तपास सुरु
मुंबईतील ताज हॉटेलाही उडवण्याची धमकी
अनोळखी ई-मेल वरुन मुंबई पोलिसांना धमकी
तुळजापुरमध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ काढली भव्य तिरंगा रॅलीतुळजापुर येथे ऑपरेशन सिंदूर मध्ये शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मिञचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.तुळजापुरातील छञपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदीर महाद्वार पर्यत ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हातामध्ये तिरंगा ध्वज,फलक घेवुन महीला माजी सैनिक,विद्यार्थी व तुळजापूरातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी भारत-माता की जय अशा घोषणा देत ही तिरंगा रॅली काढण्यात आली.
इंद्रायणी नदीच्या ब्लु लाईन मधील 29 बंगल्यावर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवातपहाटे पासून बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली
सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जातायेत
भाजप जिल्हा कार्यालायचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजनकार्यकर्त्यांच्या आशिवार्दामुळे पक्षाला चांगले दिवस आले आहेत.. कार्यकर्त्यांमुळेच भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे', या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक केले. सोबतच अपेक्षाही व्यक्त केली की, कार्यकर्त्यांनी लोकाभिमुख व्हावे.. पक्ष कार्यालय जनसामान्यांना आपले हक्काचे घर वाटले पाहीजे.. अशी भावना व्यक्त केली.. बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलिनी च्या बाजूला असलेल्या 18000 हजार स्कवेअर फुट जागेवर भव्य असे भाजपाचे हक्काचे जिल्हा कार्यालय प्रथमच उभारण्यात येणार असून त्या कार्याल्याचे भूमिपूजन करण्यात आले.. याप्रसंगी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, आ श्वेताताई महाले सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
पुण्यातील कात्रजमध्ये राष्ट्रवादी खिंडर अजित पवारांना धक्काशिवसेना शहरप्रमुख नाना भानगीरे यांची मोठी खेळी
वसंत मोरे याला टक्कर देणारा नेता सेनेते दाखल
नाना भानगीरे ॲक्टिव अनेक पक्षातील पदाधिकारी व नेते करणार प्रवेश
कात्रज विकास आघाडी फुटली
यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने "मातृनाम प्रथम" या कार्यक्रमाचे आयोजनया कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते सत्कार
प्रसिद्ध अभिनेता व कवी संकर्षण कऱ्हाडे यांचे "आई" या कवितेचे सादरीकरण आणि विद्यार्थ्यांशी आई विषयी हितगुज
जिल्हाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यात भाजपचे मोठे शक्ती प्रदर्शनसोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने मोठे शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. एकही आमदार खासदार नसणाऱ्या माढा मतदारसंघात भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या पदग्रहण सोहळ्यात भाजपने ताकद दाखवून दिली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार चित्रा वाघ यांच्यासह चार आजी-माजी आमदार चेतन सिंह केदार यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे जिल्हाध्यक्षांना माढ्यात भाजपने मोठी ताकद दिली आहे. या प्रसंगी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर माढा मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवण्याचा निश्चय नूतन जिल्हाध्यक्ष केदार यांच्यासह सर्वच नेत्यांनी केला.
Undeasonal Rain In Mumbai: मुंबई आणि उपनगरात पाऊस, मध्य लोकल सेवेवर परिणामवळवाच्या पावसानेही मध्य रेल्वे लोकलसेवा खोळंबली
मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने
Nashik: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवकाळीचे २ बळी- सलग ९ व्या दिवशी नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा
- सिन्नर तालुक्यातील त्रिसुळी भागात वीज पडून वीटभट्टीवरील कामगाराच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
- १२ वर्षांच्या विकास बर्डेचा दुर्दैवी मृत्यू
- तर मौजे नलवाडीमध्ये ३५ वर्षीय रामदास सहाणे यांचा वीज तारेचा शॉक लागून विहिरीत पडल्याने मृत्यू
धाराशिव जिल्ह्यातील ७० गावांना अधिग्रहीत विहीरी द्वारे पाणीपुरवठा तर १० गावांत टॅंकर सुरूधाराशिव जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जलस्रोत कोरडे पडु लागले आहेत.परिणामी अनेक गावांना अधिग्रहणाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.जिल्ह्यातील ७० गावांना अधिग्रहीत विहीरींद्वारे पाणीपुरवठा होत असुन १० गावांची टॅंकरवर मदार आहे.अनेक गावांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प,विहीरी तळ गाठु लागल्या आहेत.बोअरवेल देखील बंद पडत असल्याने अनेक ग्रामपंचायती पंचायत समितीकडे विहीर बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल करत आहेत.तर मान्सुन लांबणीवर गेल्यास अनेक भागात अधिग्रहण व टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहरसंग्रामपूर तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील सायखेड येथे अचानक आलेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीमुळे सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.... घरावरील संपूर्ण टिन पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.... येथील सर्व आदिवासी बांधव हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात... त्यातच अशा नैसर्गिक आपत्तीला त्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये एक प्रकारे भीतीची भावना निर्माण झाली आहे....गेल्या चार-पाच दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या नुकसान होत आहे... आता झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सायखेड येथील आदिवासींचे घरे उध्वस्त झाली असून नुकसानग्रस्तांना शासनाने तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.....
Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात ३ जुन पर्यंत 'नो प्लाइंग झोन' लागुजिल्ह्यातील सुरक्षा उपाययोजनांच्या पाश्र्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित केला आहे.
या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात १६ मे पासुन ३ जुन पर्यंत नो प्लाइंग झोन जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देशविघातक संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले असुन या कारवाईचा सुड घेण्यासाठी दहशतवादी संघटनांनी ड्रोनद्वारे हल्ल्यांची शक्यता वर्तवली आहे.
त्यामुळे पोलिस अधिक्षक धाराशिव यांच्या सुचनेनुसार तातडीने हा आदेश लागू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर्स यासह हवेत उडणारी उपकरणे वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीलाही मोठे खिंडार, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखलपुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासह अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपततात्या गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी संग्राम बाबर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.
Raigad: रायगडमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढऐन उन्हाळ्यात अंगाची काहीली होत असताना रायगडकर सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने हैराण झाले आहेत. वीज नसल्याने पंखे, कुलर, एसी बंद राहत आहेत आणि यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागतो आहे. पाण्याचा पंप देखील बंद राहत असल्याने पाण्यावाचून हाल होत आहेत. यामुळे महावितरण विरोधात संताप व्यक्त होतोय.
वाशिम नगरपालिकेच्या कचरा गाड्यांच्या वाहन चालकांचे वेतन थकले, कामगारांकडून काम बंदची हाकवाशिम नगरपालिका अंतर्गत येत असलेल्या कचरा गाड्यांच्या वाहन चालकांचे दोन महिन्यांचे वेतन थकल्याने कंत्राटी कामगारानी कामबंद आंदोलन पुकारले आहे. वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी गायकवाड यांच्या दालनासमोर वाहन चालकांनी ठिय्या आंदोलन करत कामबंद आंदोलनाची हाक दिली. 75 दिवसांचा कालावधी लोटूनही कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे या कचरा गाड्यांच्या कंत्राटी वाहन चालकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आता वाशिम शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होणार आहे.
यापूर्वीच्या कंत्राटदाराने या वाहन चालकाचे वेतन थकवल्यामुळे बंदची हात दिली होती. त्यानंतर आता वाशिम नगरपालिका या कचरा व्यवस्थापनाचे काम पाहत असतानाही या कचरा गाड्यांच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकल्यामुळे या कामगारांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचेतून कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल आहे.
अवकाळी पावसाचा महाडच्या दासगाव खाडी पट्टा विभागाला मोठा फटकारुंदीकरणाचे काम सुरु असलेल्या म्हाप्रळ पंढरपूर या मार्गावर चिखल झाला आहे. रस्त्याच्या कामादरम्यान माती भरावाचे काम सुरु असून याच दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला असून या चिखलामुळे अपघात जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चिखलामुळे रस्ता निसरडा झाला असून गाड्यांचे टायर्स घसरत आहेत. दुचाकी, चार चाकी गाड्या चालवताना कसरत करावी लागत आहे तर रस्त्यावरून चालण देखील कसरत झाली आहे. पाऊस सुरु झाला की हा रस्ता वाहतुकीसाठी ठप्प होत असून यामुळे स्थानिक नागरिक, प्रवाशी वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महामार्ग खात्याचे अधिकारी, ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष हो असून या बाबत संताप व्यक्त होत आहे.
पालखी सोहळ्यापूर्वी ग्रामपंचायतींना अनुदान मिळणार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहितीसंत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पुणे,सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यापूर्वीच पालखी मार्गावरील या ग्रामपंचायतींना तयारी करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
मागील वर्षीचे 75 टक्के अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित 25 टक्के अनुदानाची रक्कम ही मंजूर झाली आहे ती रक्कम लवकरच संबंधित ग्रामपंचायतींना दिली जाणार आहे. यावर्षी मात्र पालखी मार्गावरील सर्व ग्रामपंचायतींना तयारी करण्यासाठी म्हणून आषाढी पालखी सोहळ्यापूर्वीच अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. आषाढी पूर्वी अनुदान मिळणार असल्याने ग्रामपंचायतींना वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे आता शक्य होणार आहे.
Washim: वाशिमच्या शिरपूर येथे भीषण आग, आगीत पाच दुकानांसह शेतमाल जळून खाकवाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आज सकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास शिरपूर बसस्थानक परिसरातील विजय धोंगडे यांच्या लाकडी माळवद असलेल्या जागेला अचानक आग लागली या आगीत आगीत पाच दुकानं जळून खाक झालीत.
या आगीत जुनं हॉटेल, फोटो स्टुडिओ, टायपिंग ऑफिस, मोटर रिवाइंडिंग आणि केस कर्तनालय आणि जागेतील शेतमाल जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
आगीदरम्यान 3 ते 4 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
मालेगाव नगरपरिषद अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.
आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही; मात्र आगीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.