Maharashtra News Live Updates: बीडच्या परळीत तरुणाला मारहाण होण्याआधीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल.
Saam TV May 18, 2025 01:45 AM
बीडच्या परळीत तरुणाला मारहाण होण्याआधीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल.

परळीतील वाल्मीक कराड व गोट्या गीते गॅंग कडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये शिवराज दिवटेला अमानुष मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाण्येच्या अगोदर शिवराज दिवटे आणि आरोपींमध्ये संवाद झाला होता आणि याच संवादाची कॉल रेकॉर्डिंग झाली आहे अंतिम रेकॉर्डिंग सोशल माध्यमांवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे यामध्ये टोळीचा सूत्रधार आदिनाथ उर्फ आदित्य गीते हा असून याने शिवराज दिवटे ला फोन द्वारे जुने मारण्याची धमकी दिली होती परळीत येऊन दाख तुला काय आहे ते दाखवतो कोयत्यांनी तोडतो अशा प्रकारची धमकी दिली होती यानंतर शिवराज दिवटेला अमानुष मारहाण झाली होती आणि मारहाण करण्याच्या अगोदरची कॉल रेकॉर्डिंग सध्याला समोर आली आहे.

धुळे - वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना सहन करावा लागत आहे त्रास

अवकाळी पावसाचा जोर सध्या सुरू असताना अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, दिवसभरात व रात्रीच्या वेळी देखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे,

या संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या संदर्भात निवेदन देखील देण्यात आलेली असून, तरीदेखील या सर्व बाबींकडे वीज वितरण विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे, या संदर्भात वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्यत्या उपाय योजना करून वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.

मोराणे ब्रिजजवळ पोलिस पथकाची धडक कारवाई ; गांजासह तस्कर अटकेत

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजाची मोठी तस्करी उघडकीस आणत 28 किलो गांजा व इटिंगा वाहनासह एकूण 21 लाख 16 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ही कारवाई धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील मोराणे ब्रिजखाली करण्यात आली,

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अंतरसिंग वेचान बरडे वय 26, राहणार बडवानी, मध्यप्रदेश याला अटक करण्यात आली, तो शिरपूर येथून नाशिकच्या दिशेने 28 किलो गांजा घेऊन निघालेला होता, आरोपीच्या ताब्यातून गांजासह वाहन जप्त करण्यात आली आहे, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे करीत आहेत.

Maharashtra News Live Updates : शेतकऱ्याच्या आक्रोशाला दिल्लीतून प्रतिसाद, केंद्रीय कृषी मंत्र्यांचा थेट फोन...

अँकर: वाशिमच्या मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार याचे भईमुग पीक संपूर्ण वाहून गेले. गौरव पवार यांनी आपले पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र काही क्षणातच त्यांच्या मेहनतीचे पीक वाहून गेलं होत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली काँग्रेस नगरसेवक दत्ता बहिरट याची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली काँग्रेस नगरसेवक दत्ता बहिरट याची भेट

दत्ता बहिरट यांनी शिवाजीनगर मतदारसंघातून काँगेस कडून लढवली होती विधानसभा निवडणूक

अजितदादांची निवडणुकांसाठी ॲक्शन मोडवर

काँग्रेसची गळती थांबेना काँग्रेसचे मातब्बर नेते दत्ता बहिरट राष्ट्रवादीच्या वाटेवर.

बहिरट यांना महत्वाची जवाबदारी देणार का.

Pune News: पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

पुणे -

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

संदीपसिंग गिल पोलीस उपायुक्त झोन 1 पुणे शहर म्हणून म्हणून कार्यरत होते

Pune News Bhiwandi News: भिवंडी -ठाणे बायपासवर मिनी बसने घेतला पेट

मुंबई -नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील हायवे दिवे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपा जवळ उभ्या असलेल्या मिनी बसने शनिवारी सकाळी अचानक पेट घेतला.

पाहता पाहता आग पसरत गेल्याने या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. विशेष म्हणजे ही बस पेट्रोल पंपा समोर उभ्या असल्याने खळबळ उडाली होती.

या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणून विझविली ज्यामुळे पुढील बाका प्रसंग टळला .

Pune News: पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी संदीपसिंग गिल

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

संदीपसिंग गिल पोलीस उपायुक्त झोन 1 म्हणून म्हणून कार्यरत होते

Latur: लातूरच्या बोगस शाळेवर मनसेचा खळखट्याक...

लातूर शहरातील अनधिकृत असणारी नारायणा ई-टेक्नो स्कूल या खाजगी शाळेवर मनसेने तोडफोड केली ..आहे.... शहरातील नारायणा ई-टेक्नो स्कूल ही खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा मागच्या एक वर्षापासून शासनाची कुठलीही मान्यता न घेता राजरोजपणे सुरू आहे.. मोठ्या प्रमाणात पालकांची लूट होत असल्याच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या होत्या त्याच अनुषंगाने मनसेने हा खळखट्याक केला आहे..दरम्यान वारंवार तक्रार देऊनही खाजगी शाळा बंद होत नसल्याने मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे...

खासदार अशोक चव्हाण यांनी घेतली शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भेट

नांदेडच्या देगलूर येथील भूमिपुत्र सचिन वनंजे हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना त्यांना वीरमरण आले आहे. दरम्यान खासदार अशोक चव्हाण यांनी शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.

Nanded Politics: नांदेडमध्ये मंत्री विजय शहा विरोधात काँग्रेस आक्रमक

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणावरती हल्ला केलाय, त्या ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व भारतीय सैन्यातील अधिकारी सोफिया कुरेशी यांनी केले, त्यांच्याबद्दल मध्यप्रदेशचे भाजपचे नेते मंत्री विजय शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते,त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, यावेळी कार्यकर्त्यांकडून मंत्री विजय शहा यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आलाय..व भारत माता की जय,पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या

निफाड तालुक्यातील भरवस फाटा, गोळेगाव आणि गोंदेगाव परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवस फाटा, गोळेगाव आणि गोंदेगाव परिसरात काल संध्याकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावल्यामुळे शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने शेतांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले ड्रोन च्या माध्यमातून शेतामध्ये पाणी साचल्याचे दृश्य कैद झाले आहे

शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात शहादा शहरात आदिवासी संघटनाच्या वतीने काढण्यात आला निषेध मोर्चा...

शहादा शहरात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते आमदार....

खाली वर्दीचा चोर आल्याची घोषणाबाजी.....

आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आदिवासीच्या जमिनी बळावत असल्याच्या आरोप करत निषेध आंदोलन....

आंदोलकांना शहादा पोलिसांनी घेतलं ताब्यात....

Matheran: जलद सेवेसाठी पोस्ट कार्यालयाकडून ड्रोनचा वापर होणार

० माथेरानमधुन योजनेला प्रारंभ

० माथेरानमधुन पोस्टाचे पार्सल ने आण करताना अधिकचे श्रम आणि वेळ लागतो यावर पोस्ट खात्याकडून हायटेक उपाय

० माथेरान कर्जत दरम्यान ड्रोनची यशस्वी चाचणी

Nashik: अवकाळी पावसाने, कांदा, द्राक्ष बागेला फटका

नाशिकच्या निफाड, तसेच चांदवड तालुक्यातील वडनेर- भैरव परिसरात काल संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

शेतात झाकून ठेवलेला कांदा भिजला तर पाऊस इतका मोठ्या प्रमाणावर होता की, शेतात काढून प्लास्टिक पेपरने झाकून ठेवलेला कांदाही भिजल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

त्याच बरोबर द्राक्ष बागांना त्याचा फटका बसला असून पाण्याने जमीन खरडून गेली तर द्राक्ष बागेचे अँगल उखडले गेले,सरकारने तातडीने मदत घ्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलीय.

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांमध्ये कोकण विभागात बदलापूर नगरपालिका अव्वल

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात कोकण विभागातून कुळगांव बदलापूर नगरपालिकेनं पहिला क्रमांक पटकावलाय. नागरिकांपर्यंत सोयी सुविधा योग्यरित्या पोहोचत असल्यामुळेच आम्हाला हे यश प्राप्त झालय. त्यामुळे आमची जबाबदारी आणखीन वाढली असून कुळगांव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जास्तीत जास्त दर्जेदार आणि अधिक जलद गतीने सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असं मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितलय. बदलापूर नगरपालिकेने 27 सेवा नागरिकांना ऑनलाइन देण्याचा उपक्रम हाती घेतला असून, व्हाट्सअप द्वारे तक्रार निवारण, कुळगांव बदलापूर नगरपालिकेत प्रवेश करताना अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात सुलभता निर्माण व्हावी यासाठी एप्लीकेशनचा वापर, तसच नागरिकांच्या सोयीसाठी मोफत टोल फ्री नंबर, बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व शाळा आयएसओ मानांकन प्राप्त, कुळगांव बदलापूर नगरपालिकेचा कारभार ऑनलाईन पद्धतीने सुरळीत व्हावा म्हणून पेपरलेस ई ऑफिस, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी यासाठी उमेद या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यासह वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर बदलापूर नगरपालिकेनं कोकण विभागातील इतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये अव्वल स्थान पटकावलय.

अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोगरा ते कटासखाई रस्त्याचे काम रखडलं

अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोगरा ते कटासखाई दरम्यानच्या पाच किलो मीटर कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.

मात्र या कच्च्या रस्त्यावर सद्ध्या सहा महिन्यांपासून फक्त माती टाकून पिचिंग करण्यात आली असल्याने थोडा जरी पाऊस पडला तरी वाहनं चालविणे शक्य होणार नाही.

या परिसरातील हा मोलगी कडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे.गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्याच्या बाजूला खडी पडून आहे.

मात्र रस्त्याच्या डांबरीकरणाला अद्यापही सुरूवात करण्यात आलेली नाही.लवकरच पावसाळा सुरू होणार आहे.

जर या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर या भागातील कटासखाई,ओघाणी,चिखली, कोठली येथील लोकांना मोलगी कडे जाणे जिकिरीचे होणार आहे.

तरी संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित रस्त्याच्या कामाला सुरुवात करून दर्जेदार डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून केली जात

परळीतील जलालपूर भागात झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल

मारहाण प्रकरणातील सात जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

इतर तीन ते चार जणांचा शोध चालू...

बीड पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणी दोन पथके केली रवाना...

या गुंडगिरीला आळा बसवण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचे...

बीड जिल्ह्यात होत असलेल्या हाणामारीच्या व गुंडगिरीच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहेत...

Beed: समाधान मुंडे आणि टोळी कडून मारहाण करताना पाय पडायला लावतानाचा दुसरा व्हिडिओ समोर

- काल परळीतील शिवराज दिवटे नामक तरुणाचं अपहरण करून त्याला अमानुष लाठ्या, काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती.

- यानंतर पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथकंही रवाना करण्यात आले आहेत.

- दरम्यान आणखी एक या मारहाणीच्या दरम्यान चा व्हिडिओ समोर आलाय या मारहाणीत अमानुष मारहाण करणारे निर्दयी आरोपी मारहाण केल्यानंतर शिवराज याला सर्वांच्या पाया पडायला लावत आहेत.

बिलसवाडी जवळ मजुरांनी भरलेला आयशर ट्रक पलटी, 15 जण जखमी

जखमीत चिमुकल्या लहान मुलांचाही समावेश

ग्रामस्थांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले

बिलसवाडी जवळील घटना रावेर कडे जात असताना ही घटना घडली

सध्या जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील वाहन हटवण्याचे काम सुरू आहे...

घटनेच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी

पिंपरी चिंचवड २९वर्षीय तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी रेल्वे स्टेशन जवळील मुळा नदीपात्रात २९ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. उल्हास शिंगाडे अस बुडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उल्हास शिंगाडे हा तरुण पोहण्यासाठी नदीपात्रात गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

सदरील घटना समजताच पिंपरी चिंचवड मनपाच्या मुख्य अग्निशामक दल रात्री उशिरापर्यंत बचाव करत होते, मात्र अंधार असल्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आले, पुन्हा सकाळी बचाव कार्य सुरूकरून बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आल आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वभाव लढवण्याचे शिवसेनेचे संकेत

तुम्ही आमच्या सोबत आलात तर युती म्हणून निवडणूक लढवू नाहीतर तुम्ही स्वबळावरची भाषा केली तर आम्ही आम्हीसुद्धा स्वतंत्रपणे भगवा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असा इशारा खासदार नरेश मस्के यांनी भाजपला दिला आहे

नवी मुंबई फक्त दिसायला ताजमहाल आहे पण प्रत्यक्ष अनेक समस्या आहेत असा टोला सुद्धा नरेश मस्के यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे

युवा सेनेत जाहीर मेळाव्यात खासदार नरेश मस्के यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी केली अटक, अद्याप २० आरोपी फरार

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलीसांनी तुळजापूर तालुक्यातील कामठा येथून आरोपी शरद जमदाडे याला अटक केली आहे.

तब्बल दीड महिन्यापासुन फरार असलेल्या शरद जमदाडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण ३६ आरोपी निष्पन्न आहेत.

यातील १६ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.अद्याप २०आरोपी फरार आहेत.

Nandurbar: नंदुरबार शहरात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

वादळी वाऱ्यामुळे नंदुरबार शहरातील अनेक घरांचे उडाले पत्रे...

वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले भिंती कोसळल्या....

आदिवासी कुटुंबाच अचानक होत्याच नव्हतं झाला घर संसार उघड्यावर...

संसार उपयोगी साहित्य पाण्यात झाले खराब....

एकूण 25 घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती...

पडत्या पावसात उघड्यावर बसून रात्र काढण्याची आदिवासी महिलेवर वेळ....

माळीवाडा बंधारहट्टी परिसरात सर्वाधिक नुकसान....

खासदार श्रीकांत शिंदे यांचा टोला उद्धव ठाकरे यांना

आता निर्णय ड्रॉईंगरूम मध्ये बसून घेतले जातं नाहीत तर लोकालोकांमध्ये बसून फिरून बसून घेतले जातात

निर्णय घरात बसून, ऑनलाईन घेत नाही, आम्ही फेसबुक लाईव्ह ने नाही तर फेस टू फेस बसून घेतो

असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे युवा सेनेच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते

आयसिस मॉड्यूल प्रकरणात अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान या दोन वॉन्टेड दहशतवादी संशयितांना अटक केली

या दोघांना इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आली

मुंबईत आणण्यात आले, जिथे त्यांना न्यायालयात हजर केल जाणार

Mumbai: मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई पोलिस यंत्रणा सतर्क, तपास सुरु

मुंबईतील ताज हॉटेलाही उडवण्याची धमकी

अनोळखी ई-मेल वरुन मुंबई पोलिसांना धमकी

तुळजापुरमध्ये भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ काढली भव्य तिरंगा रॅली

तुळजापुर येथे ऑपरेशन सिंदूर मध्ये शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मिञचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.तुळजापुरातील छञपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदीर महाद्वार पर्यत ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हातामध्ये तिरंगा ध्वज,फलक घेवुन महीला माजी सैनिक,विद्यार्थी व तुळजापूरातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी भारत-माता की जय अशा घोषणा देत ही तिरंगा रॅली काढण्यात आली.

इंद्रायणी नदीच्या ब्लु लाईन मधील 29 बंगल्यावर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात

पहाटे पासून बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली

सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जातायेत

भाजप जिल्हा कार्यालायचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

कार्यकर्त्यांच्या आशिवार्दामुळे पक्षाला चांगले दिवस आले आहेत.. कार्यकर्त्यांमुळेच भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे', या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष कार्यकर्त्यांचे भरभरून कौतुक केले. सोबतच अपेक्षाही व्यक्त केली की, कार्यकर्त्यांनी लोकाभिमुख व्हावे.. पक्ष कार्यालय जनसामान्यांना आपले हक्काचे घर वाटले पाहीजे.. अशी भावना व्यक्त केली.. बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलिनी च्या बाजूला असलेल्या 18000 हजार स्कवेअर फुट जागेवर भव्य असे भाजपाचे हक्काचे जिल्हा कार्यालय प्रथमच उभारण्यात येणार असून त्या कार्याल्याचे भूमिपूजन करण्यात आले.. याप्रसंगी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, आ श्वेताताई महाले सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

पुण्यातील कात्रजमध्ये राष्ट्रवादी खिंडर अजित पवारांना धक्का

शिवसेना शहरप्रमुख नाना भानगीरे यांची मोठी खेळी

वसंत मोरे याला टक्कर देणारा नेता सेनेते दाखल

नाना भानगीरे ॲक्टिव अनेक पक्षातील पदाधिकारी व नेते करणार प्रवेश

कात्रज विकास आघाडी फुटली

यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने "मातृनाम प्रथम" या कार्यक्रमाचे आयोजन

या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते सत्कार

प्रसिद्ध अभिनेता व कवी संकर्षण कऱ्हाडे यांचे "आई" या कवितेचे सादरीकरण आणि विद्यार्थ्यांशी आई विषयी हितगुज 

जिल्हाध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यात भाजपचे मोठे शक्ती प्रदर्शन

सोलापूरच्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने मोठे शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. एकही आमदार खासदार नसणाऱ्या माढा मतदारसंघात भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या पदग्रहण सोहळ्यात भाजपने ताकद दाखवून दिली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार चित्रा वाघ यांच्यासह चार आजी-माजी आमदार चेतन सिंह केदार यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे जिल्हाध्यक्षांना माढ्यात भाजपने मोठी ताकद दिली आहे. या प्रसंगी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर माढा मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवण्याचा निश्चय नूतन जिल्हाध्यक्ष केदार यांच्यासह सर्वच नेत्यांनी केला.

Undeasonal Rain In Mumbai: मुंबई आणि उपनगरात पाऊस, मध्य लोकल सेवेवर परिणाम

वळवाच्या पावसानेही मध्य रेल्वे लोकलसेवा खोळंबली

मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने

Nashik: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवकाळीचे २ बळी

- सलग ९ व्या दिवशी नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा

- सिन्नर तालुक्यातील त्रिसुळी भागात वीज पडून वीटभट्टीवरील कामगाराच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

- १२ वर्षांच्या विकास बर्डेचा दुर्दैवी मृत्यू

- तर मौजे नलवाडीमध्ये ३५ वर्षीय रामदास सहाणे यांचा वीज तारेचा शॉक लागून विहिरीत पडल्याने मृत्यू

धाराशिव जिल्ह्यातील ७० गावांना अधिग्रहीत विहीरी द्वारे पाणीपुरवठा तर १० गावांत टॅंकर सुरू

धाराशिव जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जलस्रोत कोरडे पडु लागले आहेत.परिणामी अनेक गावांना अधिग्रहणाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.जिल्ह्यातील ७० गावांना अधिग्रहीत विहीरींद्वारे पाणीपुरवठा होत असुन १० गावांची टॅंकरवर मदार आहे.अनेक गावांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प,विहीरी तळ गाठु लागल्या आहेत.बोअरवेल देखील बंद पडत असल्याने अनेक ग्रामपंचायती पंचायत समितीकडे विहीर बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल करत आहेत.तर मान्सुन लांबणीवर गेल्यास अनेक भागात अधिग्रहण व टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील सायखेड येथे अचानक आलेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीमुळे सर्वसामान्य आदिवासी बांधवांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.... घरावरील संपूर्ण टिन पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.... येथील सर्व आदिवासी बांधव हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात... त्यातच अशा नैसर्गिक आपत्तीला त्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये एक प्रकारे भीतीची भावना निर्माण झाली आहे....गेल्या चार-पाच दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या नुकसान होत आहे... आता झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सायखेड येथील आदिवासींचे घरे उध्वस्त झाली असून नुकसानग्रस्तांना शासनाने तात्काळ आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.....

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात ३ जुन पर्यंत 'नो प्लाइंग झोन' लागु

जिल्ह्यातील सुरक्षा उपाययोजनांच्या पाश्र्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित केला आहे.

या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात १६ मे पासुन ३ जुन पर्यंत नो प्लाइंग झोन जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत देशविघातक संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले असुन या कारवाईचा सुड घेण्यासाठी दहशतवादी संघटनांनी ड्रोनद्वारे हल्ल्यांची शक्यता वर्तवली आहे.

त्यामुळे पोलिस अधिक्षक धाराशिव यांच्या सुचनेनुसार तातडीने हा आदेश लागू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर्स यासह हवेत उडणारी उपकरणे वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीलाही मोठे खिंडार, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल

पुणे जिल्ह्यातील कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासह अनिल कोंढरे, गणेश मोहिते, सिद्धार्थ वंशी, तानाजी दांगट, निलेश धनावडे, नितीन कोमन, गणपततात्या गुजर, भालचंद्र पवार आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे आणि ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी संग्राम बाबर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.

Raigad: रायगडमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ

ऐन उन्हाळ्यात अंगाची काहीली होत असताना रायगडकर सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने हैराण झाले आहेत. वीज नसल्याने पंखे, कुलर, एसी बंद राहत आहेत आणि यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागतो आहे. पाण्याचा पंप देखील बंद राहत असल्याने पाण्यावाचून हाल होत आहेत. यामुळे महावितरण विरोधात संताप व्यक्त होतोय.

वाशिम नगरपालिकेच्या कचरा गाड्यांच्या वाहन चालकांचे वेतन थकले, कामगारांकडून काम बंदची हाक

वाशिम नगरपालिका अंतर्गत येत असलेल्या कचरा गाड्यांच्या वाहन चालकांचे दोन महिन्यांचे वेतन थकल्याने कंत्राटी कामगारानी कामबंद आंदोलन पुकारले आहे. वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी गायकवाड यांच्या दालनासमोर वाहन चालकांनी ठिय्या आंदोलन करत कामबंद आंदोलनाची हाक दिली. 75 दिवसांचा कालावधी लोटूनही कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे या कचरा गाड्यांच्या कंत्राटी वाहन चालकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आता वाशिम शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होणार आहे.

यापूर्वीच्या कंत्राटदाराने या वाहन चालकाचे वेतन थकवल्यामुळे बंदची हात दिली होती. त्यानंतर आता वाशिम नगरपालिका या कचरा व्यवस्थापनाचे काम पाहत असतानाही या कचरा गाड्यांच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकल्यामुळे या कामगारांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचेतून कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारल आहे.

अवकाळी पावसाचा महाडच्या दासगाव खाडी पट्टा विभागाला मोठा फटका

रुंदीकरणाचे काम सुरु असलेल्या म्हाप्रळ पंढरपूर या मार्गावर चिखल झाला आहे. रस्त्याच्या कामादरम्यान माती भरावाचे काम सुरु असून याच दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला असून या चिखलामुळे अपघात जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चिखलामुळे रस्ता निसरडा झाला असून गाड्यांचे टायर्स घसरत आहेत. दुचाकी, चार चाकी गाड्या चालवताना कसरत करावी लागत आहे तर रस्त्यावरून चालण देखील कसरत झाली आहे. पाऊस सुरु झाला की हा रस्ता वाहतुकीसाठी ठप्प होत असून यामुळे स्थानिक नागरिक, प्रवाशी वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महामार्ग खात्याचे अधिकारी, ठेकेदाराचे याकडे दुर्लक्ष हो असून या बाबत संताप व्यक्त होत आहे.

पालखी सोहळ्यापूर्वी ग्रामपंचायतींना अनुदान मिळणार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पुणे,सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्यापूर्वीच पालखी मार्गावरील या ग्रामपंचायतींना तयारी करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

मागील वर्षीचे 75 टक्के अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित 25 टक्के अनुदानाची रक्कम ही मंजूर झाली आहे ती रक्कम लवकरच संबंधित ग्रामपंचायतींना दिली जाणार आहे. यावर्षी मात्र पालखी मार्गावरील सर्व ग्रामपंचायतींना तयारी करण्यासाठी म्हणून आषाढी पालखी सोहळ्यापूर्वीच अनुदानाचे वाटप केले जाणार आहे. आषाढी पूर्वी अनुदान मिळणार असल्याने ग्रामपंचायतींना वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे आता शक्य होणार आहे.

Washim: वाशिमच्या शिरपूर येथे भीषण आग, आगीत पाच दुकानांसह शेतमाल जळून खाक

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आज सकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास शिरपूर बसस्थानक परिसरातील विजय धोंगडे यांच्या लाकडी माळवद असलेल्या जागेला अचानक आग लागली या आगीत आगीत पाच दुकानं जळून खाक झालीत.

या आगीत जुनं हॉटेल, फोटो स्टुडिओ, टायपिंग ऑफिस, मोटर रिवाइंडिंग आणि केस कर्तनालय आणि जागेतील शेतमाल जळून खाक झाला असून, लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

आगीदरम्यान 3 ते 4 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

मालेगाव नगरपरिषद अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.

आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही; मात्र आगीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.