आयपीएलच्या 18 व्या मोसमात रविवारी 18 मे रोजी डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. अक्षर पटेल याच्याकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. प्लेऑफच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. गुजरातकडे हा सामना जिंकून प्लेऑफमधील प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. तर दिल्लीला आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थिती जिंकावा लागणार आहे. अशात या सामन्यात चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दिल्ली आणि गुजरात दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही या हंगामातील दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी गुजरातने दिल्लीवर 19 एप्रिलला 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली आता या सामन्यात विजयी होत गेल्या पराभवाचा हिशोब चुकता करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दिल्ली विरुद्ध गुजरात सामना रविवारी 18 मे रोजी होणार आहे.
दिल्ली विरुद्ध गुजरात सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.
दिल्ली विरुद्ध गुजरात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
दिल्ली विरुद्ध गुजरात सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह मॅच पाहायला मिळेल.
दरम्यान गुजरात आणि दिल्लीचा हा या मोसमातील प्रत्येकी 12 वा सामना आहे. गुजरातने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. गुजरात 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्लीला 11 पैकी फक्त 6 सामने जिंकता आले आहेत. तर 4 वेळा पराभव झाला आहे. तसेच 5 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दिल्लीच्या खात्यात 13 पॉइंट्स आहेत.