ईट (जि.धाराशिव) : ट्रॅव्हल्सच्या उघड्या ठेवलेल्या डिकीचा पत्रा लागल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ईट येथे घडली. प्रवीण शिवाजी भोसले असे तरुणाचे नाव आहे.
आक्का नावाची ट्रॅव्हल्स (एमएच ०१ सीआर ८१५४) वाशी येथून ईटमार्गे पुण्याकडे जात होती. या भरधाव ट्रॅव्हल्सची डिकी उघडी असल्याने शेतामध्ये जाणाऱ्या मागील दुचाकीस्वाराला डिक्कीचा पत्रा लागल्याने प्रवीण भोसले याचा जागीच मृत्यू झाला, तर विशाल आप्पा भोसले गंभीर जखमी झाला.
संतप्त जमावाने बसचालकाला मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्या. ईट येथे पोलिस दूरक्षेत्र कार्यालय असताना अपघातस्थळी पोलिस कर्मचारी दाखल न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.