भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एकदा आयपीएलच्या 18 व्या मोसमाला सुरुवात झालीय. आरसीबी विरुद्ध केकेआर सामना 17 मे रोजी पावसामुळे रद्द करण्यात आला. तर रविवारी 18 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा खेळाडू आयपीएलमधील सामन्यांसाठी भारतात परतला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हा खेळाडू पुढील सामन्याला मुकणार आहे. सनरायजर्स हैदराबादचा स्फोटक सलामीवीर ट्रेव्हिस हेड याला कोरोना झाला आहे. त्यामुळे हेड भारतात येऊ शकला नाही. तसेच हेडला पुढील सामन्याला मुकावं लागणार आहे. याबाबतची माहिती सनरायजर्स हैदराबादचा हेड कोच डॅनियल व्हीटोरी याने दिली आहे.
बीसीसीआयने भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे 9 मे रोजी आयपीएलचा 18 वा मोसम एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर परदेशी खेळाडू मायदेशी परतले. ट्रेव्हिस हेड देखील ऑस्ट्रेलियात परतला. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि सनरायजर्स हैजराबादचा कर्णधार भारतात परतला. मात्र हेड भारतात आला नाही. त्यामुळे हेड कोरोनामुळे भारतात परतला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच हेडला लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागणार आहे. हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना 19 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
हेड कोच डॅनियल व्हीटोरी याने शनिवारी पत्रकार परिषदेत हेडला कोरोना झाल्याची माहिती दिली. हेडला ऑस्ट्रेलियातच कोरोना झाल्याचं व्हीटोरी स्पष्ट केलं. हेड कोरोना झाल्यामुळे भारतात वेळेत परतू शकला नाही. हेड आता सोमवारी परतणार आहे. त्यामुळे हेड लखनौ विरुद्ध खेळू शकणार नाही. तसेच त्यानंतरही हेड खेळू शकणार की नाही? हे देखील आवश्यक तपासणीनंतर स्पष्ट होईल. मात्र हेड उर्वरित सामन्यांना मुकला तरीही हैदराबादला काही फरक पडणार नाही. कारण हैदराबादचं प्लेऑफमधील आव्हान आधीच संपुष्ठात आलं आहे.
दरम्यान हैदराबादला या मोसमात त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.हैदराबादला या मोसमात 11 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच विजयी होता आलं. तर तब्बल 10 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांनी हैदराबादचा धुव्वा उडवला. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये 6 गुणांसह नवव्या स्थानी आहे.