पैसा ठेवा तयार! येत्या आठवड्यात ५ आयपीओ उघणार तर २ शेअर्स होणार सूचिबद्ध, जाणून घ्या तपशील
Upcoming IPO : प्राथमिक बाजार पुन्हा सक्रिय होण्यास सज्ज झाला आहे कारण मेनबोर्ड विभागातील दोन नवीन प्रारंभिक समभाग विक्री (IPO) पुढील आठवड्यात सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहेत. दरम्यान, लघु आणि मध्यम उद्योग (SME) विभागातील तीन नवीन आयपीओ देखील बोलीसाठी उघडतील.नवीन IPO व्यतिरिक्त बाजारात इंटिग्रिटी इन्फ्राबिल्ड डेव्हलपर्स लिमिटेड आयपीओ आणि अॅक्रेशन फार्मास्युटिकल्स लिमिटेड आयपीओच्या दोन नवीन लिस्टिंग देखील दिसतील. २०२४ मध्ये आयपीओ बाजारातून कंपन्यांनी विक्रमी १.६ लाख कोटी रुपयांचा निधी उभारला होता. पुढील आठवड्यात हे आयपीओ होणार खूले
बोराना विव्हज लिमिटेड आयपीओBorana Weaves Limited आयपीओ २० मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि २२ मे रोजी बंद होईल. आयपीओ १४४.८९ कोटी रुपयांचा बुक-बिल्डिंग असून पूर्णपणे ०.६७ कोटी शेअर्सचा नवीन आयपीओ आहे.बोराना विव्हज आयपीओचा किंमत पट्टा २०५ रुपये ते २१६ रुपये प्रति शेअर असा निश्चित केला आहे. बीलाइन कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड बोराना विव्हज आयपीओचा बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या इश्यूचा रजिस्ट्रार आहे.
बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड आयपीओBelrise Industries आयपीओ २१ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि २३ मे रोजी बंद होईल. हा २,१५० कोटी रुपयांचा बुक-बिल्डिंग असून २३.८९ कोटी शेअर्सचा नवीन आयपीओ आहे.बेलराईज इंडस्ट्रीज आयपीओचा किंमतपट्टा ८५ रुपये ते ९० रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे बेलराईज इंडस्ट्रीज आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे आयपीओचे रजिस्ट्रार आहेत.
व्हिक्टरी इलेक्ट्रिक व्हेइकल्स आयपीओVictory Electric Vehicles आयपीओ २० मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि २३ मे रोजी बंद होईल. हा एसएमई आयपीओ ४०.६६ कोटींचा असून ज्यामध्ये ५६.४७ लाख शेअर्स असतील.व्हिक्टरी इलेक्ट्रिक व्हेइकल्स आयपीओची किंमत प्रति शेअर ७२ रुपये आहे. कॉर्पविस अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही व्हिक्टरी इलेक्ट्रिक व्हेइकल्स आयपीओची बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे, तर माशिटला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड ही आयपीओची रजिस्ट्रार आहे.
दार क्रेडिट आणि कॅपिटल आयपीओDar Credit and Capital आयपीओ २१ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि २३ मे रोजी बंद होईल. हा एसएमई आयपीओ २५.६६ कोटींचा बुक-बिल्डिंग असून ज्यामध्ये पूर्णपणे ४२.७६ लाख नवीव शेअर्स आहेत.या एसएमई आयपीओचा किंमतपट्टा ५७ रुपये ते ६० प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. जीवायआर कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही दार क्रेडिट अँड कॅपिटल आयपीओची बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही आयपीओची रजिस्ट्रार आहे.
युनिफाइड डेटा-टेक आयपीओUnified Data- Tech आयपीओ २२ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि २६ मे रोजी बंद होईल. हा आयपीओ १४४.४७ कोटींची बुक-बिल्डिंग आहे आणि यामध्ये ५२.९२ लाख शेअर्सची ऑफर फॉर सेल आहे.या एसएमई आयपीओ किंमत पट्टा २६० ते २७३ रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. हेम सिक्युरिटीज लिमिटेड ही युनिफाइड डेटा-टेक आयपीओची बुक-रनिंग लीड मॅनेजर आहे, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही आयपीओचे रजिस्ट्रार आहे. नवीन लिस्टिंग
व्हर्च्युअल गॅलेक्सी इन्फोटेक आयपीओ: Virtual Galaxy Infotech आयपीओसाठी वाटप गुरुवार, १५ मे रोजी अंतिम करण्यात आले. कंपनीचे शेअर्स १९ मे रोजी एनएसई एसएमईवर सूचीबद्ध होतील.
इंटिग्रिटी इन्फ्राबिल्ड डेव्हलपर्स आयपीओ: Integrity Infrabuild Developers आयपीओसाठी वाटप शुक्रवार, १६ मे रोजी अंतिम करण्यात आले. आयपीओ एनएसई एसएमई वर सूचीबद्ध असेल ज्याची तात्पुरती लिस्टिंग तारीख मंगळवार, २० मे निश्चित केली आहे.
अॅक्रेशन फार्मास्युटिकल्स आयपीओ: Accretion Pharmaceuticals आयपीओसाठी वाटप सोमवार, १९ मे रोजी अंतिम होण्याची अपेक्षा आहे. आयपीओ एनएसई एसएमई वर सूचीबद्ध असेल ज्याची तात्पुरती लिस्टिंग तारीख बुधवार, २१ मे निश्चित केली आहे.