अभिनेते शरद पोंक्षे मागील काही दिवसांपासून 'बंजारा' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या मुलाने म्हणजेच स्नेह पोंक्षेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक म्हणून हा स्नेहचा पहिलाच चित्रपट आहे. शरद पोंक्षे यांनी लेकाच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
शरद पोंक्षे आणि त्यांचा लेक स्नेह पोंक्षे मागील काही दिवसांपासून बंजारा या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. प्रमोशनच्या निमित्ताने राजश्री मराठी शोबझ या कार्यक्रमाला दोघांनी भेट दिली. तेव्हा गप्पा मारताना शरद यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'मी स्नेहला एक गोष्ट सांगितली होती. या क्षेत्रात २ गोष्टींपासून लांब राहायचं. एक म्हणजे बाई आणि दुसरी म्हणजे .'
'बाई आणि बाटली दोन्ही गोष्टी करिअरची वाट लावतात. एक वेळ प्रेम कर, पण ते निष्ठेने कर. दर दोन वर्षांनी प्रेम बदलत राहील असं करु नकोस, त्याला प्रेम म्हणत नाही, हे मी स्नेहला सांगितले होते', असे वक्तव्य यांनी केले. याव्यतिरिक्त पोंक्षे यांनी कार्यक्रमात इतर गोष्टींवर देखील गप्पा मारल्या.
१६ जून २०२५ रोजी हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये शरद पोंक्षे आणि स्नेह पोंक्षे ही बापलेकाची जोडी पहिल्यांदा ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे. शरद यांनी चित्रपटाची निर्मिती, तर स्नेहने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पोंक्षे पितापुत्रासह चित्रपटात भरत जाधव, सुनील बर्वे, संजय मोने, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज असे कलाकार या चित्रपटामध्ये दिसणार आहे.