Pakistan and India Tensions : आधी लगीन IPL चं, फायनल लांबल्याने या क्रिकेटस्टारचं लग्न पुढं ढकललं
GH News May 19, 2025 09:05 AM

Kuldeep Yadav Wedding Postponed: भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादव यंदा बोहल्यावर चढणार आहे. त्याचं लग्न आयपीएलची फायनल होतात लागणार होतं. परंतू भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलची मालिका ८ मे रोजी आठवडाभर पुढे ढकलली होती. शनिवार १७ मेपासून या मॅचेस पुन्हा सुरु झाल्या आहेत. परंतू आयपीएल २०२५ ची फायनल त्यामुळे पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे कुलदीप यादव याला त्याचं लग्नच पुढे ढकलल्याचे म्हटलं जात आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांनी कुलदीप यादव याच्या लग्नाबाबत सुतोवाच केले आहे. कुलदीप गुपचुप लगीन करणार आहे. त्याची होणारी वधू नक्की कोण आहे तिचा चेहरा समोर आलेला नाही. परंतू त्याने तिच्या सोबत सात फेरे करण्याची योजना गुप्तपणे रचली होती. परंतू त्याच्या लग्नाच्या तयारीवर भारत-पाक तणावाने पाणी फेरले आहे.ही बातमी कोणासही माहीती नव्हती. सुरेश रैना याने ती फोडल्याने सर्वांना समजली आहे. अन्यथा ३० वर्षीय कुलदीपचे केव्हा दोनाचे चार हात झाले असते ते लग्न झाल्यानंतरच कळले असते.

सर्वसाधारणपणे मोठ-मोठे क्रिकेटपटू अभिनेत्रीसोबत रिलेशनमध्ये असतात नंतर मग ते लग्नाचा विचार करतात.मात्र कुलदीप याने स्वत:च मोठी हिंट दिली आहे की तो कोणत्या अभिनेत्री सोबत लग्नगाठ बांधणार नसून ती अन्य क्षेत्रातील असणार आहे.

IPL 2025 कुलदीप यादव याची कामगिरी

आयपीएल 2025 मध्ये कुलदीप यादव याची खेळी ठीकठाक राहीली आहे. गुजरात टायटन्स विरोधातील सामन्याआधी त्याने १२ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या. या आयपीएल दौऱ्यात मिचेल स्टार्क (१८ ) याच्यानंतर दिल्लीसाठी दुसरे सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज बनले आहेत.आरसीबीचा सध्याचा कप्तान रजत पाटीदार यानेही आयपीएलमुळे त्याचं लग्न पुढे ढकलेली होती. तो साल २०२२ मध्ये लग्न करणार होता.परंतू त्यावर्षी त्याला त्याच सिझनमध्ये आरसीबीचे कॉन्ट्रॅक मिळाले होते.संधीचा पुरेपुर लाभ उठवण्यासाठी त्यानेही त्याचे लग्न पुढे ढकलेले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.