Ananya-Chunky Panday VIDEO : 'मैं तेरा तोता...'; बापलेकीचा जबरदस्त डान्स, चंकी पांडे अन् अनन्या बेफाम होऊन नाचले
Saam TV May 19, 2025 03:45 PM

बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून अनन्या पांडे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. आजवर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. नुकताच 'झी सिने अवॉर्ड्स' ( Zee Cine Awards 2025 ) पार पडला. या शोमध्ये अनन्या पांडेने (Ananya Panday) चारल चाँद लावले आहेत. तिच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे आणि चंकी पांडे बेभान होऊन नाचताना दिसत आहे.

2025' 17 मे ला पार पडला आहे. या सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आपल्या डान्सने कलाकारांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. या सोहळ्याला आणि चंकी पांडे (Chunky Panday ) या बाप-लेकीच्या जोडीने तर कमालच केली. अनन्या पांडेने 'झी सिने अवॉर्ड्स'मध्ये आपल्या वडिलांच्या (चंकी पांडे ) गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

चंकी पांडेच्या 'मैं तेरा तोता' या गाण्यावर अनन्या पांडेने कमाल डान्स केला आहे. त्याला शेवटी चांगली जोड दिली आहे. 'मैं तेरा तोता' हे गाणे 'पाप की दुनिया' या 1988 ला रिलीज झालेल्या चित्रपटातील आहे. 'मैं तेरा तोता' हा त्या काळचे सुपरहिट गाणे आहे. अनन्याने वडिलांसोबत या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

अनन्या डान्स करत असताना चंकी पांडे स्टेजवर एन्ट्री घेतात आणि लेकीसोबत नाचू लागतात. त्याचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चंकी पांडे आणि अनन्या पांडे यांच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.