Gold Rate Today : लग्नसराईच्या हंगामात सराफा बाजार फुलला; जाणून घ्या आजचे सोन्याचे भाव
ET Marathi May 19, 2025 03:45 PM
Gold Rate 19 May : आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया-युक्रेन युद्ध तसेच अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष निवळल्याच्या आशादायी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत गेल्या काही दिवसात सातत्याने घसरण नोंदवली गेली. परंतू आज त्यात काहीशी वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांना मागणी आहे, त्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारही सोन्याच्या किंमतींवर लक्ष ठेवून असतात. चला तर आजचे सोन्याचे भाव जाणून घेऊ या... आज सोन्याची किंमत ३२२६.५० डॉलर्स प्रति औंस इतकी आहे तर चांदीची किंमत ३२.५७ डॉलर्स प्रति औंस इतकी आहे. यासोबत देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याची किंमत ९३,२३३.०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर चांदीची किंमत ९५,६७८.०० रुपये किलो इतकी आहे.देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ९३,६४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८५,८३७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तसेच चांदीची किंमत ९५,८६० रुपये प्रति किलो आहे. जाणून घेऊया राज्यातील शहरांमधील सोने-चांदीचे भाव ()
शहराचे नाव आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा २२ सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ८५,६८१ रुपये ८५,४५२ रुपये
पुणे ८५,६८१ रुपये ८५,४५२ रुपये
नागपूर ८५,६८१ रुपये ८५,४५२ रुपये
कोल्हापूर ८५,६८१ रुपये ८५,४५२ रुपये
जळगाव ८५,६८१ रुपये ८५,४५२ रुपये
ठाणे ८५,६८१ रुपये ८५,४५२ रुपये
शहराचे नाव आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा २४ सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ९३,४७० रुपये ९३,२४० रुपये
पुणे ९३,४७० रुपये ९३,२४० रुपये
नागपूर ९३,४७० रुपये ९३,२४० रुपये
कोल्हापूर ९३,४७० रुपये ९३,२४० रुपये
जळगाव ९३,४७०रुपये ९३,२४० रुपये
ठाणे ९३,४७०रुपये ९३,२४० रुपये
आजचा चांदीचा भाव (Silver Rate Today)
शहराचे नाव आजचा चांदीचा भाव (प्रतिकिलो) कालचा चांदीचा भाव (प्रतिकिलो)
मुंबई ९५,६९० रुपये ९६,२३० रुपये
पुणे ९५,६९० रुपये ९६,२३० रुपये
नागपूर ९५,६९० रुपये ९६,२३० रुपये
कोल्हापूर ९५,६९० रुपये ९६,२३० रुपये
जळगाव ९५,६९० रुपये ९६,२३० रुपये
ठाणे ९५,६९० रुपये ९६,२३० रुपये
टीप : येथे नमूद करण्यात आलेले सोने - चांदीचे भाव कोणत्याही कर आणि मजूरी शुल्क शिवाय आहेत, हे भाव स्थानिक पातळीवर वेगवेगळे असू शकतात.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.