Fashion Tips : लेटेस्ट रिंग्स डिझाइन्सने मिळवा शाही लूक
Marathi May 19, 2025 08:25 PM

एखाद्या खास कार्यक्रमासाठी तयार व्हायचं असेल तर पारंपरिक कपडे परिधान करण्याला प्राधान्य दिले जाते. त्या आउटफिटला साजेसे दागिने आणि फूटवेअर्सही निवडले जातात. नेकलेस, बांगड्या, कानातले, पैंजण यांच्यासोबतच आपण आपल्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अंगठीकडेही नीट लक्ष द्यायला हवे. सध्या बाजारात वेगवेगळ्या डिझाइन्सच्या आणि आकाराच्या रिंग्स मिळू लागल्या आहेत त्यामुळे आपल्या आउटफिटनुसार साजेशी योग्य ती रिंग निवडणे गरजेचे आहे. यासाठीच जाणून घेऊयात काही लेटेस्ट रिंग्स डिझाइन्स.

जर तुम्हाला तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवायचे असेल, तर तुम्ही या लेखात दाखवलेल्या अंगठ्या निवडू शकता. या अंगठ्या स्टाईल केल्यानंतर तुमचा लूक रॉयल दिसेल.

रॉयल लूकसाठी या अंगठ्या करा स्टाईल

कुंडन वर्क रिंग

या अंगठीवर अतिशय सुंदर कुंदन आणि मोत्यांचे काम केलेले असते. हिरवा, गुलाबी, लाल, निळा अशा वेगवेगळ्या रंगांचे कुंदन वर्क असलेल्या या अंगठ्या आपल्या आउटफिटसोबत आपल्याला मॅच करता येतात. तुम्हाला या रिंग्स ऑनलाइन देखील सहज मिळतील आणि ती बाजारातून ऑफलाइनही 100 ते 150 रुपयांना खरेदी करता येईल. अशा प्रकारची अंगठी साडी किंवा लेहेंग्यासोबत तुम्ही स्टाईल करू शकता.

मोती कामाची अंगठी

फॅशन टिप्स: नवीनतम रिंग्ज डिझाइनसह रॉयल लुक मिळवा

जर तुम्हाला नवीन डिझाइनची अंगठी हवी असेल तर तुम्ही या प्रकारची मोत्याचे वर्क असणारी अंगठी निवडू शकता. या प्रकारची अंगठी तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवेल, आणि यात तुमचा लूकही शाही दिसेल. या अंगठीचं वैशिष्ट्य हे की पांढऱ्या रंगाच्या मोतींची डिझाइन असलेली ही अंगठी साडी, कुर्ता अशा सगळ्याच प्रकारच्या आणि कोणत्याही रंगाच्या आउटफिटवर सहज शोभून दिसते.

अमेरिकन डायमंड रिंग

फॅशन टिप्स: नवीनतम रिंग्ज डिझाइनसह रॉयल लुक मिळवा

नवीन, स्टायलिश आणि हटके लूकसाठी तुम्ही या प्रकारची अंगठी देखील निवडू शकता. या अंगठीवर अमेरिकन डायमंडचे काम असते. ही अंगठी तुमच्या हातात सुंदर दिसेल आणि तुम्ही ही अंगठी बाजारातून किंवा ऑनलाइन 500 रुपयांना खरेदी करून स्टाईल करू शकता. तुम्ही ही अंगठी हलक्या आणि गडद दोन्ही रंगांच्या आउटफिटसह स्टाईल करू शकता.

फुलांच्या डिझाइनची अंगठी

फॅशन टिप्स: नवीनतम रिंग्ज डिझाइनसह रॉयल लुक मिळवा

जर तुम्हाला नवीन डिझाइनमध्ये काहीतरी हवे असेल तर तुम्ही फ्लोरल प्रकारची अंगठी निवडू शकता. ही एक आगळीवेगळी आणि नव्या डिझाइनची अंगठी तुमच्या आउटफिटला सुंदर लूक देईल.

हेही वाचा : Pooja Sawant New Film : ब्रेक संपला, पूजा सावंतचं नव्या चित्रपटातून सिनेसृष्टीत कमबॅक


संपादित – तनवी गुडे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.