आजच जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता १० वी व १२वीच्या निकालात द ऑर्बिस स्कूल, केशवनगर व मुंढवा च्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश व उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या दोन्ही शाळांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे व गुणांची टक्केवारी खालील प्रमाणे.
द ऑर्बिस स्कूल, केशवनगर प्रथम आलेले विद्यार्थी :
इयत्ता १०वी - लक्षिता पटनायक - 99.4%
इयत्ता १२ वी - गायत्रीदेवी जयचंद्रन (९८.६%) (ह्यूमनीटीएस विभाग)
द ऑर्बिस स्कूल, मुंढवा प्रथम आलेले विद्यार्थी :
इयत्ता १०वी - अय्यर विविक्ता गणेश - ९८.४%
इयत्ता १२ वी - आयरिसा बिंदू शफीक (९६%) (कॉमर्स विभाग)
याप्रसंगी बोलताना द ऑर्बिस स्कूलसच्या संचालक मुख्याध्यापिका गुंजन श्रीवास्तव म्हणाल्या की “सीबीएसई इयत्ता १०वी आणि १२वी च्या परीक्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी ही त्यांच्या कठोर मेहनती, सातत्य आणि ऑर्बिस स्कूल्समध्ये दिल्या जाणाऱ्या भक्कम शैक्षणिक पायाभरणीचे प्रतिक आहे.
केवळ गुणांच्या पलीकडे पाहिल्यास, जिज्ञासा, चिकाटी, सहकार्य आणि संकटांवर मात करण्याची जिद्द हीच आमच्या विद्यार्थ्यांची खरी ओळख ठरते. पालकांचा निःस्वार्थ पाठिंबा, शिक्षकांची समर्पित सेवा आणि विद्यार्थ्यांचे प्रामाणिक प्रयत्न यांच्या बळावर आम्ही एकसंघ समुदाय म्हणून काय साध्य करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
हा उल्लेखनीय निकाल आपल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या पालकांच्या अखंड पाठबळाचा आणि आमच्या समर्पित शिक्षकवर्गाच्या योगदानाचा परिपाक आहे. हा संपूर्ण ऑर्बिस समुदायासाठी अभिमानाचा क्षण आहे.
या यशाचा आनंद साजरा करताना, आपल्या विद्यार्थ्यांनी घडवणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही आशावादी आहोत. प्रत्येक मनःपूर्वक अभिनंदन करताना, या यशात योगदान दिलेल्या प्रत्येकाचे आभार मानतो.