१९ मे अपघात घडला व दोघांचा मृत्यू
२० मे मद्यपान करून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या मुलाला बाल न्याय मंडळाकडून जामीन
२१ मे विशाल अगरवाल, नमन भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नीतेश शेवानी आणि जयेश गावकर यांना अटक
२२ मे अल्पवयीन आरोपीची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी
२४ मे मुलाचे वडील असलेल्या बांधकाम व्यावसायिकासह पब चालक व कर्मचाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
२४ मे तपासात दिरंगाई केल्याबद्दल येरवडा ठाण्यातील पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी निलंबित
२५ मे तपास गुन्हे शाखेकडे वर्ग
२५ मे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र अग्रवाल यांच्या बंगल्यावर पोलिसांचा छापा
२५ मे चालकाला धमकावल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक
२६ मे चालकाला धमकावल्याप्रकरणी विशाल अग्रवाल यांना अटक
२७ मे विशाल अग्रवाल, कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज
२७ मे डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना अटक
२८ मे चालकाला धमकावले म्हणून विशाल व सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी
३० मे रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेतले असल्याची पोलिसांची न्यायालयात माहिती
१ जून विशाल अग्रवालसह पब मालकांच्या जामिनाबाबत पोलिसांचे म्हणणे सादर
१ जून रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल व शिवानी विशाल अग्रवाल यांनी अटक
२ जून शिवानी आणि विशाल अग्रवाल यांना पाच जूनपर्यंत पोलिस कोठडी
२ जून डॉ. तावरेसह इतरांच्या कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ
४ जून रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी अश्पाक बाशा मकानदार आणि अमर संतोष गायकवाड यांना अटक
५ जून मुलाऐवजी आईचेच रक्त घेतल्याचे डीएनए अहवालात स्पष्ट
५ जून बांधकाम व्यावसायिक, कोझीचे मालक व ब्लॅक पबच्या कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी
५ जून अग्रवाल पती-पत्नीला १० तर डॉक्टरांना सात जूनपर्यंत पोलिस कोठडी
५ जून मुलाचा बालसुधारगृहात मुक्काम १२ जूनपर्यंत वाढविला
१२ जून अल्पवयीन मुलाबरोबर पार्टीत सामील झालेल्या १५ जणांची चौकशी
१२ जून मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम २५ जूनपर्यंत वाढला
१५ जून मुलाला जामीन मंजूर करताना जेजेबीच्या मंडळाकडून पुष्कळ चुका राहिल्याचा चौकशी समितीचा अहवाल सादर
२५ जून अल्पवयीन मुलास उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
१ ऑगस्ट अग्रवाल दांपत्य, डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, मकानदार, घटकांबळेंविरोधात ९०० पानी दोषारोपपत्र दाखल
१५ नोव्हेंबर सूद, मित्तलविरोधात २४२ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल
१० जानेवारी सिंगविरोधात ४७७ पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल
२३ एप्रिल २०२५ शिवानी अग्रवाल हिस सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन
कल्याणीनगर अपघातातील आरोपींची सद्यस्थिती
आरोपींची नावे गुन्ह्यातील भूमिका आत्ता ते कुठे आहेत
१ अल्पवयीन मुलगा बेदरकारपणे वाहन चालवत धडक दिल्याने दोघांचा मृत्यू न्यायालयाकडून
जामीन मंजूर
२ शिवानी विशाल अग्रवाल तपासणीसाठी मुलाऐवजी स्वतःचे रक्त दिले सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन
३ सुरेंद्रकुमार अग्रवाल गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणत अपहरणाचा प्रयत्न जामीन मंजूर
४ कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले जामीन मंजूर
५ कोझीचे व्यवस्थापक सचिन अशोक काटकर अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले जामीन मंजूर
६ ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले जामीन मंजूर
७ कर्मचारी नीतेश धनेश शेवानी अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले जामीन मंजूर
८ ब्लॅकच्या बार काउंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरवले जामीन मंजूर