Political Live Update : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना डिवचलं.
Sarkarnama May 19, 2025 10:45 PM
Nana Patole : अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजून गुन्हेगारी वाढली

अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजून गुन्हेगारी वाढली असा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे. ते म्हणाले अजित पवार हे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजून गुन्हेगारी वाढली, त्यानंतर बीडमध्ये पुन्हा माफियांचे राज्य उभे राहिले आहे असं पटोले यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना डिवचलं

भारत पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत मोदींना डिवचलं आहे. मोदीजी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? जवळपास एक महिना झाला. तुमचं लक्ष देशाच्या सुरक्षेवर आहे की प्रचारमध्ये?’ असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

Deepak Mankar : दीपक मानकर यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. समाज कंटकाकडून आपली राजकीय बदनामी केली जात असल्याचं म्हणत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कटकारस्थान करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. दीपक मानकर यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

Mangesh Chavan : भाजप आमदाराचा पोलिस ठाण्यात ठिय्या

भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या सुरु केला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाखांची लाच मागितली असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. त्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.

ब्राह्मण म्हणून मला काँग्रेसमध्ये त्रास, ॲट्रॉसिटीचा कट, राहुल गांधींना 100 ई-मेल केले...

पुणे काँग्रेसच्या माजी महिला शहराध्यक्ष आणि राज्यातील महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये मी ब्राह्मण असल्याने मला त्रास देण्यात आला. ब्राह्मण असल्याने माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा कट कारस्थान देखील करण्यात आलं. याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना शंभर ईमेल करून तक्रार करून देखील दखल घेतली गेली नसल्याचं संगीता तिवारी यांनी सांगितला आहे.

बीडमध्ये अजितदादांचा वाचक कमी पडत आहे : रोहित पवार

परळीत जो व्हिडिओ आलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या काही महिन्यात तेथील पोलीस प्रशासनावर बऱ्यापैकी वचक बसलेले आहे. मात्र तेथील काही पूर्वीचे नेते आणि टोळीला लागलेली सवय मोडायला वेळ लागत आहे. पालकमंत्री म्हणून अजित दादांनी जो वचक पोलिसांवर आणला आहे तो कमी पडत आहे.

विधानभवनाच्या गेटवर मोठी आग

मुंबईमध्ये विधान भवनाच्या गेटवर मोठी आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग भडकल्याचे सांगितले जाते. पण कर्मचाऱ्यांनी फायर एक्टिंग्युशरच्या सहाय्याने ही आग विझवली आहे.

इतके फटके बसलेत, त्यातून बाहेर पडणे अवघड : संभाजीराजेंची स्थानिकच्या निवडणुकीतून माघार

इतके फटके बसलेत त्यातून बाहेर पडणे अवघड आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्याबाबत स्वराज्य पक्षाने अद्याप काही ठरवलेले नाही. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करू. निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांबाबत भाष्य केलं.

Supreme Court News : भाजप मंत्र्यांना फटकारले

भाजपचे मध्य प्रदेशातील मंत्री विजय शहा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शाह यांनी सुप्रीम कोर्टात माफीनामा सादर केला. पण कोर्टाने माफी स्वीकारण्यास नकार देत त्यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi News : पुन्हा परराष्ट्र मंत्री निशाण्यावर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, पाकिस्तानला भारताच्या ऑपरेशनची माहिती होती. त्यामुळे भारताची किती विमाने आपण गमावली?, असा सवाल राहुल यांनी केला आहे. ही चूक नाही, गुन्हा आहे. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे राहूल यांनी म्हटले आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीही जयशंकर यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत हाच सवाल केला होता. पाकिस्तानला ऑपरेशनची आधीच माहिती दिली होती, असे जयशंकर या व्हिडीओत म्हटल्याचा दावा राहुल यांनी केला होता.

Yusuf Pathan News : शिष्टमंडळातून माघार

तृणमूल काँग्रेसचे खासदार यूसुफ पठाण यांनी केंद्र सरकारच्या शिष्टमंडळातून माघार घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना पठाण यांचे नाव मागे घेत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारत आणि पाकिस्तानातील संघर्षानंतर जगभरात देशाची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केले आहे. हे शिष्टमंडळ जगातील विविध देशांमध्ये भारताची बाजू मांडणार आहेत.

Mumbai Live: मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट

मुंबईला उडवून देण्याची धमकी देणार फोन अज्ञात व्यक्तीनं केल्यानं खळबळ उडाली आहे. डायल 112 ला धमकीचा फोन आला आहे. जे जे मार्ग परिसरात एका व्यक्तीच संभाषण ऐकल्याचा कॉलरचा दावा आहे.

Joe Biden : जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर हाडांपर्यंत पसरला...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगचे (prostate cancer) निदान झालं आहे. तो आता हाडांपर्यंत पसरला आहे. बायडेन यांच्या कार्यालयाने रविवारी ही माहिती दिली. 82 वर्षीय बायडेन यांना गेल्या शुक्रवारी त्यांना हा आजार झाल्याचे निदान झाले.

Mohan Bhagwat live: मोहन भागवत यांचा आज नाशिक दौरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दोन दिवस त्यांचा दौरा आहे. नाशिकच्या भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये सुरू असलेल्या संघ वर्गात २८० स्वयंसेवकांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

Ratnagiri Accident : जगबुडी नदीच्या पुलावरून कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथे कार अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जगबुडी नदीच्या पुलावरून जवळपास शंभर फूट खोल कार कोसळल्यामुळे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्राध्यापकाला अटक

ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हरयाणाच्या सोनीपत येथील खासगी विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. अली खान महमूदाबाद असं अशोका विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापकाचे नाव आहे.

अजित पवार परळीच्या दौऱ्यावर

बीडचे पालकमंत्री अजित पवार हे पालकमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या देखील दिसल्या.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या न्यायालयात आज सुनावणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाची आज पाचवी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयात होणार आहे. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी यांनी निकम यांच्या अनुपस्थित काम पाहिले होते. आज देखील तेच काम पाहतील अशी माहिती आहे.

रायगडला लवकरच पालकमंत्री मिळणार - अजित पवार

रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळेल, असे अजित पवार म्हणाले. पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील. पालकमंत्री नसला तरी रायगडची विकास कामे थांबलेलेली नाहीत. लोकसंख्येच्या प्रमाणात रायगडला निधी देण्यात आला आहे.

हशतवादी सैफुल्लाह खालिदचा खात्मा

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तामध्ये तणावाचे वातावरण आहे. या वातावरणात पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिद याला गोळ्या झाडून संपवण्यात आले. तीन जणांनी खालिद याच्यावर गोळीबार करत त्याचा खात्मा केला. गोळीबार करणारे कोण होते हे मात्र समोर आले नाही.

शिवराज दिवटेला मारहाण निषेधार्थ परळीत मराठा संघटनांचे आज आंदोलन

शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे. मराठा संघटनांकडून बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र बीड बंद मागे घेण्यात आला असून परळीमध्ये मराठा संघटनांकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा संघटना आंदोलनावर ठाम आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.