कुंभोज : बाबूजमाल दर्गा (Babujamal Dargah) व दर्गा परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे मत आमदार (MLA Vinay Kore) यांनी व्यक्त केले. येथील हजरत बाबूजमालसाहेब कलंदर (पहाडी) शरीफ दर्ग्याच्या कलशारोहणप्रसंगी ते बोलत होते. बाहुबली एण्डोमेंन्ट ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते.
धर्मगुरू हजरत मोहम्मद कलीमुल्ला शाह चिस्ती मिर्झाई (हैदराबाद), हजरत अब्दुलसमद मोहंमद अजिमजी पिरजादे, खुसरो असुदल्ला चिस्ती (कुडची) प्रमुख उपस्थित होते. आमदार अशोकराव माने म्हणाले, ‘बाबूजमाल दर्गा पंचक्रोशीचे श्रध्दास्थान आहे. दर्ग्यास येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. येथील सोयी-सुविधांचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावू.’
माजी आमदार राजू आवळे, राजीव आवळे, सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण यादव, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, शिवसेनेचे बी. एल. शिंगे, ‘राजाराम’चे तज्ज्ञ संचालक अमित साजणकर यांनी मनोगत व्यक्त केले. वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, ‘जवाहर’चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच अशोक आरगे, वन परिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे उपस्थित होते.