आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स निराशाजनक कामगिरी राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 13 पैकी 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. काही सामन्यात तर विरोधकांना विजयाचा घास तोंडातून खेचून नेला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही तसंच काहीसं झालं. धावांचा पाठलाग करताना राजस्थानला दहा धावा तोकड्या पडल्या. जिंकलेला सामना हातून गमवल्याने प्रशिक्षक राहुल द्रविड चांगलाच संतापलेला दिसला. या सामन्यातील पराभवानंतर राहुल द्रविडने संघातील उणीवा कबूल केल्या. ‘फक्त फलंदाजांना दोष देऊन चालणार नाही. मला वाटतं आम्ही गोलंदाजीतही चांगलं करू शकलो नाहीत. प्रामाणिकपणे सांगायचं तर ही विकेट 220 धावांची नव्हती. 195 ते 200 धावा ठीक होत्या. पण आम्ही अतिरिक्त 20 धावा दिल्या. आकडेवारी पाहीली तर आम्ही गोलंदाजीत काही खास करू शकलो नाहीत. विकेट घेण्यात आणि धावा नियंत्रित करण्यात आम्ही अपयशी ठरलो. आम्ही प्रत्येक सामन्यात 200-220 धावांचा पाठलाग करत आहोत.’
राहुल द्रविडने पुढे सांगितलं की, ‘हे खूप कठीण काम होतं. आम्ही धावांचा जवळ पोहोचलो होतो. पण आम्ही ते पूर्ण करू शकलो नाहीत. गोलंदाजीत 15 ते 20 धावा अतिरिक्त द्यायच्या आणि नंतर सामना जिंकताना चांगल्या स्थितीत असता. पण आम्ही धावांचा पाठलाग करू शकलो नाहीत. मधल्या आणि खालच्या क्रमात आम्ही आवश्यक असताना मोठे फटके मारू शकलो नाहीत.’ राजस्थान रॉयल्सचा 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ससोबत शेवटचा सामना आहे. या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ थेट 2026 आयपीएल स्पर्धेत दिसणार आहे. त्यामुळे आता या वर्षभरात संघ बांधणी खूपच काम करावं लागणार आहे.
राहुल द्रविडने एका वर्षानंतर तरुण खेळाडू कसे खेळू शकतात याबाबत भाकीत वर्तवलं. ‘वैभव सूर्यवंशी भारताच्या 19 वर्षाखालील संघात भरपूर क्रिकेट खेळेल. रियान पराग देखील भरपूर क्रिकेट खेळणार आहे. सर्वच खेळाडू भारतासाठी खूप सारं क्रिकेट खेळणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कठीण क्रिकेट असणार आहे. त्यामुळे आशा आहे की पुढे जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा अनुभव गाठीशी बांधलेला असेल. तेव्हा हे खेळाडून प्रतिभावंत असणार आहेत.’, असं राहुल द्रविड पुढे म्हणाला.