Monsoon Disease Risk : पावसाळ्यात कोणते आजार होतात? जास्त धोका कशाचा..नियंत्रणासाठी काय करावे?
esakal May 19, 2025 08:45 PM

How to Prevent Diseases in Monsoon: पावसाळा म्हणजेच निसर्गाचा आनंददायक ऋतू, परंतु या ऋतूमध्ये विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार उद्भवण्याची शक्यता अधिक असते. वातावरणातील आर्द्रता, साचलेले पाणी आणि उष्णता यामुळे विषाणू, बॅक्टेरिया व बुरशीचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे आजारांची लागण सहज होते.

पावसाळ्यात होणारे सामान्य आजार कोणते?

1. सर्दी, ताप आणि खोकला – हवामानात झालेल्या बदलामुळे सर्दी आणि ताप सामान्यतः होतो.

2. डेंग्यू आणि चिकनगुनिया – हे आजार डासांमुळे होतात, विशेषतः Aedes डासांपासून. साचलेल्या पाण्यात हे डास वाढतात.

3. मलेरिया – Anopheles डासांमुळे होणारा मलेरिया सुद्धा या काळात मोठ्या प्रमाणात आढळतो.

4. टायफॉइड – दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा टायफॉइड पावसाळ्यात वाढतो.

5. जुलाब व उलट्या – दूषित पाणी प्यायल्याने होणारे हे आजार सामान्य आहेत.

6. लेप्टोस्पायरोसिस – उंदीराच्या लघवीमुळे पाण्यात मिसळलेले जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करून हा आजार निर्माण करतात.

7. फंगल इन्फेक्शन्स – आर्द्रतेमुळे त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. त्वचेवर खाज, लालसरपणा आणि पुरळ दिसतात.

जास्त धोका कशाचा?

डेंग्यू, आणि टायफॉइड हे आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतात. डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी होतात आणि शरीरात रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. मलेरियामुळेही ताप, थंडी आणि अंगदुखीचे तीव्र त्रास होतात. टायफॉइडमध्ये पचनसंस्था बिघडते आणि उच्च ताप असतो. वेळेत उपचार न केल्यास हे आजार जीवघेणे ठरू शकतात.

नियंत्रणासाठी उपाय कोणते?

1. स्वच्छता पाळा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. साचलेले पाणी झाकून ठेवा किंवा नष्ट करा.

2. डासांपासून संरक्षनासाठी संध्याकाळी व रात्री पूर्ण कपडे घालावेत. मच्छरदाणी, रेपेलंट वापरा.

3. शुद्ध पाणी प्या उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच वापरा.

4. उघड्यावरचे व अस्वच्छ अन्न टाळा. घरचे ताजे अन्नच खा.

5. पावसात भिजल्यानंतर लगेच कपडे बदला. अंग कोरडे ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

6. ताप, अंगदुखी, उलट्या, पुरळ यांसारखे लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आजारांची शक्यता वाढते, मात्र योग्य काळजी घेतल्यास आपण या आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. स्वच्छता, अन्न-पाण्याची शुद्धता आणि वेळेत उपचार हे त्रिसूत्री पालन करणे हेच आरोग्य टिकवण्याचे खरे गमक आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.