भारतातील असं राज्य ज्या राज्याला आजही राजधानी नाही? चला जाणून घेऊया!
भारतातील प्रत्येक राज्याची राजधानी आहे. पण या सर्वांमध्ये, एक राज्य असे आहे ज्याची स्वतःची कोणतीही राजधानी नाही.
या राज्याच्या राजधानीसाठी दोन नावे निश्चित झाली असली तरी, कागदावर अधिकृतपणे राजधानी निश्चित झालेली नाही.राजधानीची
2014 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या विभाजनानंतर, आंध्र प्रदेशला नवीन राजधानीची आवश्यकता होती, परंतु राज्य सरकारने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही.
सध्या, विजयवाडा आणि अमरावती यांना आंध्र प्रदेशची राजधानी म्हटले जाते, परंतु दोन्ही शहरांना अधिकृतपणे राजधानी म्हणून घोषित केलेले नाही.
2014 मध्ये आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि हैदराबादला 10 वर्षांच्या कालावधीसाठी दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी बनवण्यात आले.
2025 मध्ये आंध्रप्रदेशकडे कोणतीही कार्यरत, कायमस्वरूपी राजधानी नाही.
सरकारी कार्यालयं सध्या विविध शहरांमध्ये विखुरलेली आहेत.
अमरावतीला आंध्रची अधिकृत राजधानी बनवण्यासाठी जानेवारी 2025 पासून काम सुरू आहे. लवकरच अमरावती पूर्णपणे राजधानी म्हणून विकसित होईल आणि त्याची मंजुरी देखील पाठवण्यात आली आहे.