देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या महाराष्ट्र प्रिमीयर लीग अर्थात MPLला 4जूनपासून सुरुवात होत आहे. या लीगचे हे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेतील एक आघाडीचा संघ असलेल्या रत्नागिरी जेट्सचा यावेळी पहिला सामना 4 जून रोजी ईगल टायटन्स नाशिक संघासोबत होणार आहे.
2023 व 2024 हंगामाचे विजेते असलेला रत्नागिरी जेट्स संघ या स्पर्धेत एकूण 10 सामने खेळणार आहे. साखळी फेरीत त्यांचा शेवटचा सामना 19 जून रोजी होणार आहे. सलग तिसऱ्या हंगामात या संघाचे नेतृत्व आझीम काझीकडे देण्यात आले आहे. प्रदिप दाढे, सत्यजीत बच्छाव, विजय पावले, निखील नाईक, किरण चोरमालेसारखे दिग्गज खेळाडू यावेळी संघाचे भाग आहेत.
या स्पर्धेत 20 जून रोजी क्वॉलीफायर 1 व एलिमीनेटरचे सामने होतील. 21 जून रोजी क्वॉलीफायर 2चा सामना होईल. 22 जून रोजी फायनलचा सामना होईल.
रत्नागिरी जेट्सचे MPL 2025चे वेळापत्रक
4 जून, विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, सायंकाळी 7 वाजता
6 जून, विरुद्ध पुणेरी बाप्पा, दुपारी 2 वाजता
7 जून, विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, दुपारी 2 वाजता
8 जून, विरुद्ध सातारा वॉरियर्स, सायंकाळी 7 वाजता,
10 जून, विरुद्ध रायगडड रॉयल्स, सकाळी 9.30 वाजता
13 जून, विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, सायंकाळी 7 वाजता
15 जून, विरुद्ध सातारा वॉरियर्स, दुपारी 2 वाजता
16 जून, विरुद्ध रायगड रॉयल्स, सकाळी 9.30 वाजता
17 जून, विरुद्ध पुणेरी बाप्पा, दुपारी 2 वाजता
19 जून, विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, सायंकाळी 7 वाजता