शहापूरमध्ये बांबूलागवड मेळावा
शहापूर, ता. १९ (वार्ताहर) : राज्य शासनाच्या धोरणानुसार वनपट्टे तसेच खासगी जमिनींवर बांबूलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत कृषी मूल्य आयोग समितीचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या उपस्थितीत शहापूर शहराजवळील वाफे गावातील गंगा देवस्थान येथे सोमवारी (ता. २६) मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यात शेतकऱ्यांना बांबूलागवडीसंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती व सहकार्य उपलब्ध करण्यात येणार आहे.