Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर…
Marathi May 20, 2025 09:24 AM

महाराष्ट्र ब्रेकिंग लाइव्ह अद्यतने: राज्याच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी समोर आलंय. राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.मुंबईच्या राजभवनात मंगळवारी सकाळी शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी आता भुजबळांवर देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. आता तेच खातं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळाना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

राज्यात पुहा हा कोरोनाव्हायरसचा उद्रेक आहे.

2020 साली चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला. लाखो लोकांनी जीव गमावला. मात्र त्यानंतर अख्खं जग यातून हळूहळू सावरलं. पण आता हाच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. भारतासह जगभरात कोरोना विषाणूबाधित नवे रुग्ण आढळतायत. मुंबईत 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाहीये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.