IPL 2025 : मुंबई इंडियन्सला मोठा झटका, 3 खेळाडू पलटणची साथ सोडणार, या त्रिकुटाला संधी
GH News May 20, 2025 06:11 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स या संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. तर सोमवारी 19 मे रोजी सनरायजर्स हैदराबादने विजय मिळवत लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफचं स्वप्न भंग केलं. त्यामुळे आता एका जागेसाठी दिल्ली कॅपिट्ल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात थेट लढत आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात 21 मे रोजी हायव्होल्टेज सामना होणार आहे. त्याआधी मुंबईला मोठा झटका लागला आहे. दिल्ली विरूद्धच्या निर्णायक सामन्याआधी 3 खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. त्यामुळे मुंबईला झटका बसला आहे.

विल जॅक्स, रायन रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश या तिघांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमातून माघार घेतली आहे. हे तिघेही साखळी फेरीनंतर आपल्या देशाकडून खेळण्यासाठी मायदेशात रवाना होणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने बदली खेळाडूची नावं जाहीर केली आहेत. पलटणने या तिघांच्या जागी जॉनी बेयरस्टो, रिचर्ड ग्लीसन आणि चारिथ असलांका या तिघांचा समावेश करण्यात आलाय.

विल जॅक्स याच्या जागी इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जॉनी बेयरस्टो याला मुंबईने 5 कोटी 25 लाख रुपयात करारबद्ध केले आहे. रायन रिकेल्टन याच्या जागी रिचर्ड ग्लीसनचा समावेश करण्यात आलाय. रिचर्डसाठी मुंबईने 1 कोटी रुपये मोजले आहेत. कॉर्बिन बॉश याच्या जागी चरिथ असलांकाला संधी दिली गेलीय. चरिथसाठी टीम मॅनजमेंटने 75 लाख रुपये मोजले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई इंडियन्सले प्लेऑफसाठी क्वालिफाय केलं तरच या तिघांना खेळण्याची संधी मिळेल.

मुंबई विरुद्ध दिल्ली सामना

मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात बुधवारी 21 मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना होणार आहे. दिल्लीने हा सामना जिंकल्यास त्यांचं प्लेऑफसाठीचं आव्हान कायम राहिल. मात्र मुंबई जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहचेल. त्यामुळे हा सामना अटीतटीचा असणार आहे.

मुंबईचं प्लेऑफचं समीकरण

मुंबईने या 18 व्या हंगामात आतापर्यंत 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मुंबईला आणखी 2 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मुंबई दिल्ली विरुद्ध पराभूत झाली तरी 16 पॉइंटसपर्यंत पोहचण्यासाठी आणखी एक संधी असणार आहे. मात्र दिल्लीला कोणत्याही स्थितीत मुंबई विरुद्ध जिंकावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवून टॉप 2 मध्ये पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.