तळेगाव दाभाडे, ता. २० : ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत लष्कराने केलेल्या पराक्रमानंतर सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले) देशभर ‘भारत जिंदाबाद’ यात्रा काढणार आहे. महाराष्ट्रात २२ मे ते ५ जूनपर्यंत या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या यात्रेचे आयोजन केले आहे. सर्व नागरिकांनी या यात्रेत तिरंगा झेंडा घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका, शहर अध्यक्षांनी या यात्रेचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही वाघमारे यांनी म्हटले आहे.