Test Cricket : कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, या खेळाडूची 2 वर्षानंतर एन्ट्री, कॅप्टन कोण?
GH News May 21, 2025 12:08 AM

टीम इंडिया आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने झिंबाब्वे विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. बेन स्टोक्स याचं दुखापतीनंतर कमबॅक झालं आहे. बेन स्टोक्स या सामनात इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. हा सामना 22 मे रोजी होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नॉटिंगघममधील ट्रेन्ट ब्रिज स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

सॅम कुक याला पदार्पणाची संधी

निवड समितीने झिंबाब्वे विरूद्धच्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज सॅम कुक याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. कुकने गेल्या काही वर्षात काउंटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच कुकने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 19.85 च्या सरासरीने 321 विकेट्सही घेतल्आ आहेत. कुकने गेल्या 5 हंगामात एसेक्ससाठी 227 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.तसेच जवळपास 2 वर्षांनंतर जोश टंग याचं इंग्लंड संघात कमॅबक झालं आहे. टंगने इंग्लंडसाठी जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रतिष्ठेच्या एशेस सीरिजमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

इंग्लंडने या व्यतिरिक्त टीममध्ये फर बदल केलेले नाहीत. झॅक क्रॉली आणि बेन डकेट ही जोडी ओपनिंग करेल. ओली पोप तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी येईल. जो रुट, हॅकी ब्रूक आणि कॅप्टन बेन स्टोक्स या तिघांवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असणार आहे. जेमी स्मिथ विकेटकीपिंग करणार आहे. तसेच जोश टंग, गस एटकिंसन आणि सॅम कुक या त्रिकुटावर वेगवान गोलंदाजाची जबाबदारी असेल.

झिंबाब्वे विरूद्धच्या एकमेव कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कॅप्टन), जेमी स्मिथ (विकेटकीपर), गस एटकिंसन, जोश टंग, सॅम कुक आणि शोएब बशीर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.