सध्या इंडियन प्रीमियर लीगचा 18वा हंगाम सुरू आहे. (Indian Premier League 2025) यादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) (3 जून) रोजी आयपीएलच्या फायनल सामन्यासाठी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सऐवजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमची (Narendra Modi Stadium) निवड केली आहे. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, ईडन गार्डन्समध्ये (25 मे) रोजी आयपीएल 2025 चा फायनल सामना होणार होता.
पण, भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमा तणावामुळे स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित आयपीएल 2025च्या वेळापत्रकानुसार फायनल सामन्यासाठी (3 जून) ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता प्लेऑफच्या सर्व सामन्यांचे ठिकाण निश्चित झाले आहे.
आयपीएल टी ट्वेंटी (iplt20) च्या रिपोर्टनुसार, मंगळवारी (20 मे) बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पहिले 2 प्लेऑफ सामने नवीन चंदीगडमधील मुल्लानपूर येथे खेळवले जातील, तर आयपीएल 2025 चा फायनल सामना कोलकात्याहून पूर्णपणे हलवण्याचे मुख्य कारण (3 जून) रोजी पावसाचा अंदाज होता.
आयपीएल वेळापत्रक (प्ले-ऑफ)
(29 मे 2025), सायं. 7.30 क्वॉलीफायर 1 मुल्लानपूर, चंदिगढ
(30 मे 2025), सायं. 7.30 एलिमीनेटर- मुल्लानपूर, चंदिगढ
(01 जून 2025), सायं. 7.30 क्वॉलीफायर 2- अहमदाबाद
(03 जून 2025), संध्याकाळ. 7.30 अंतिम- अहमदाबाद