मुघल बादशहा औरंगजेबची सगळ्यात छोटी बहीण रोशन आरा ही आपल्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध होती.
शहाजहानचे दोन्ही मुलं औरंगजेब आणि दारा शिकोह यांच्यात सत्तेसाठी युद्ध झालं तेव्हा रोशन आराने औरंगजेबाची साथ दिली.
तर त्यांच्या मोठ्या बहिणीने दारा शिकोहची साथ दिली होती. युद्धात जिंकल्यानंतर औरंगजेब बादशहा झाला.
औरंगजेबाने रोशन आराच्या जागी जहांआराला प्राधान्य दिलं आणि तिला पादशाह बेगमची उपाधी दिली. जहांआराच्या खांद्यावर पूर्ण हरमची जबाबदारी होती.
पदवी मिळाल्यानंतर जहांआराला लाल किल्ल्याच्या बाहेर एक हवेली मिळाली. तर दुसरीकडे रोशनआरा बेगमला किल्ल्यामध्ये असलेल्या हरमच्या बाहेरही निघता येत नव्हतं.
प्रसिद्ध इतिहासकार इरा मुखौटी सांगतात, रोशनआरा बेगमवर औरंगजेबाचा पूर्ण विश्वास नव्हता. तिचे काही प्रेमी असू शकतात, असं त्याला वाटे.
इतिहासकार अनिशा शेखर मुखर्जी यांच्या पुस्तकातील माहितीप्रमाणे औरंजेबाचा संशय खरा होता.
रोशनआराचा एक प्रेमी किल्ल्यातील सुरक्षा भेदून तिला भेटण्यासाठी लाल किल्ल्यात दाखल झाला होता.
दोघांची भेट झाली तिने त्याला काही दिवस स्वतःकडेच ठेवलं, पण कुणालाच भनक लागू दिली नाही. नंतर त्याला बाहेर पडण्यासाठी तयारी केली.
रोशन आराच्या खासगी सेवकांमार्फत तो युवक बाहेर पडणार होता. अंधाऱ्या रात्री नियोजन झालं. पण पकडले जाऊ अशी शंका आल्याने सेविका पळून गेल्या.
धोका मिळाल्याने युवक अडकला. भीतीने त्याची गाळण झाली. रात्रभर रस्ता शोधू लागला. परंतु यश मिळालं नाही.
सकाळी तो गार्डनमधील भूलभूलैयामध्ये गोंधळलेला दिसला. हरमच्या परिसरात एक अनोळखी इसम आढळून येणं गंभीर होतं.
त्याला औरंगेजबसमोर सादर करण्यात आलं. त्याने म्हटलं की, नदीकिनारी किल्ल्याच्या उंच भींतीवरुन शाही महलात गेलो.
परंतु औरंगजेबाला त्याचा बनाव लक्षात आला नाही. त्याला त्याच रस्त्याने उतरण्याचा आदेश दिला. गार्ड त्याला भीतींकडे घेऊन गेले.
सैनिकांनी त्याला भीतींवरुन खाली फेकून दिलं. पुढे तो वाचला की मेला, याच्या नोंदी सापडत नाहीत.