पंचांग -
बुधवार : वैशाख कृष्ण ९, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ५.४४, सूर्यास्त ७.०२, चंद्रोदय उ. रात्री १.५४, चंद्रास्त दुपारी १.०६, भारतीय सौर वैशाख ३१ शके १९४७.
दिनविशेष -
२००२ - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा मानाचा ‘चित्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना जाहीर.
२०१३ - भारताची महिला गिर्यारोहक अरुणिमा सिन्हाची सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई. एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली दिव्यांग महिला.