Maharashtra Weather Update Live Update : धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने 36 गावांमध्ये नुकसान
Saam TV May 21, 2025 04:45 PM
Beed: बीड तालुक्यातील साक्षर पिंपरी येथील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान

बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने सर्व दूर हजेरी लावली आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथील शिवराज नामक शेतकऱ्यांच्या शेतामधील लावलेला कांदा हा काढणीला आला होता मात्र वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्या तर शेतकऱ्यांनी सांगितला आहे 50 हजार रुपये खर्च करून कांद्याची लागवड केली होती मात्र अवकाळी पावसाने होत्याच नव्हतं केला आहे या संदर्भात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना फोन करून माहिती दिली मात्र कोणीही आमच्या बांधावरती फिरकले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे

Pandharpur: वादळीवारे आणि अवकाळीमुळे पंढरपुरात डाळिंब बागांचे नुकसान

वादळीवाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील 65 हेक्टर क्षेत्रावरील विविध फळ बागांना फटका बसला आहे. यामध्ये शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

बोहाळी येथील शेतकरी अंबादास हावळे या शेतकऱ्याची जवळपास 16 एकर डाळिंब बाग जमीन दोस्त झाली आहे. यामध्ये सुमारे दहा टन डाळिंबाचे नुकसान झाले असून सुमारे पंधरा लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

हावळे यांची 17 एकर डाळिंब बाग आहे. डाळिंब काढणीस काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे बागेला मोठा फटका बसला आहे. जोरदार आल्या आलेल्या वाऱ्यामुळे डाळिंबाची झाडे मोडून पडली आहेत.

यावर्षी डाळिंबाला दर चांगला असल्याने हावळे यांनी डाळिंब बागेसाठी जवळपास 30 ते 40 लाख रुपयांचा खर्च केला आहे.

आता तोंडाशी आलेली डाळिंब बागेचे अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.

याबरोबरच पेरू, केळी या बागांचेही नुकसान झाले आहे.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने 36 गावांमध्ये नुकसान

जिल्ह्यातील लोहारा,उमरगा,तुळजापूर, कळंब,धाराशिव सह भुम मध्ये अवकाळीचा पावसाचा फटका

आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे 28 जनावरे ही दगावली

पावसामुळं 56 घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर

शासनदरबारी आतापर्यंत 296 हेक्टर नुकसानीची आणखी क्षेत्र वाढण्याची शक्यता?

नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

उरुळी कांचन येथे कंटेनर व ट्रकचा अपघात; दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी, वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा

उरुळी कांचन, येथील अत्यंत गजबजलेल्या तळवडी चौकात कंटेनर व एका ट्रकचा अपघात झाला आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावर सोलापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अक्षय कामठे, मनोज मोहोड, अश्वजीत रत्नपारखे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा कंटेनर हा तळवाडी तळवडी चौकातून शिंदवणे रोडकडे वळत होता. यावेळी सोलापूर च्या बाजूने आलेल्या ट्रक ने कंटेनर ला जोरदार धडक दिली. यावेळी दोन्ही वाहने रस्त्यावर पडली.

दरम्यान, यावेळी पुणे- सोलापूर महामार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी वाहतूक चालकांनी मोठी गर्दी केली होती. सदरची माहिती मिळताच घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस पोहोचले. व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Washim Rain: अवकाळीचा असाही फटका, जमिनीतच भुईमूगाच्या शेंगाना फुटले अंकुर

वाशिम जिल्ह्यात परिपक्व झालेला भुईमूग काढण्यास उशीर झाल्यानं जमिनीतच भुईमूगाच्या शेंगाना अंकुर फुटू लागल्याचा प्रकार समोर आलाय.

वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने काढणीस आलेल्या भुईमूगाला उशीर झाला त्यामुळे शेंगा परिपक्व होऊन कालावधी उलटल्याने जमिनीतच शेंगांना अंकुर फुटू लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत असून अवकाळीचा हा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

वाशिम जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा 5 हजार 143 हेक्टरवर झाला होता.

सध्या भुईमुगाचा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसात जिल्ह्यात अवकाळी पाऊसामुळे दुहेरी फटका बसला आहे.

सोलापूर एमआयडीसीमध्ये घडलेल्या आगीच्या दुघर्टनेबाबत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून दखल

१८ मे रोजी सोलापूर एमआयडीसी मधील टॉवेल कारखान्याला भीषण आग लागून ८ अल्पसंख्याक व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.

या घटनेसंदर्भात आयोगाचे सदस्य वसीम बु-हाण यांनी त्याच दिवशी भेट देऊन पाहणी केलेली आहे.

घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात (दुर्घटनेची कारणे आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली कार्यवाही) स्वंयस्पष्ट अहवाल आयोगास सात दिवसात सादर करण्यात यावा. असे निर्देश अल्पसंख्यांक आयोगाने दिलेले आहे.

सोलापुरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना आयोगाने पाठवलं पत्र

Nashik: विजेच्या खांबावर शॉकसर्किटमुळे लागली आग

नाशिकच्या येवला शहरातील राणा प्रताप पुतळ्या परिसरातील विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली असून यावेळी स्थानिकांनी त्वरित अग्निशामक दलाला संबंधित आगीची माहिती देताच अग्निशामक दलाची गाडी दाखल होत आग आटोक्यात आणली. या खांबावर मोठ्या प्रमाणात इंटरनेटच्या वायरिंग चे जाळे असून आगीत खांबावरील संपूर्ण वायरिंग जळून खाक झाली आहे.तर शहरातील विद्युत पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे तीन रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर महापालिका हद्दीतील ८३ वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. १२ मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत. त्यातून ते बरेही झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूवाडी तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. २० मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या सर्वांची प्रकृती सुधारत असून ते लवकरच बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केलाय.

रत्नागिरी - जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची विश्रांती, मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण

काल दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपलं

सर्वच तालुक्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

कालच्या पावसाने ठिकठिकाणी वीज पडल्याच्या घटना

दरम्यान आजपासून पुढचे तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

घाट भागात प्रवास टाळण्याचं आवाहन

मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन

Maharashtra Weather Update Live Update : लातूर जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात

लातूर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे... तर 2 तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे... लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या रेणा नदी पात्रात देखील पाण्याचा प्रवाह वाढला आहे.... अनेक भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे... दरम्यान पुढील काही तास लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे.

Maharashtra Weather Update Live Update :: मान्सूनपूर्व पावसाचा ५६ गावांना फटका, उन्हाळी पिकांचे नुकसान

मे महिन्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे..

त्याचबरोबर उन्हाळी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..

आतापर्यंत जिल्ह्यातील ५६ गावांमध्ये जवळपास ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील उन्हाळी पिके आणि फळबागांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला आहे...

या पावसामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून 12 जनावरांचा मृत्यु झालाय ..

Maharashtra Weather Update Live Update : जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा, सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त 150 जणांनी केलं रक्तदान

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ब्लड बँकेमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते सिताराम ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व तरुणांनी पुढाकार घेत बीड जिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी तब्बल दीडशे जणांनी रक्तदान केलं. यामुळे जिल्ह्यात जाणवणाऱ्या तुटवड्यात कुठेतरी आमचा मुंगीचा वाटा असेल आणि ज्याला गरज पडेल त्याला जीवदान मिळण्यासाठी रक्ताचा वापर केला जाईल तसेच वाढदिवसानिमित्त ॲम्बुलन्स सेवा देखील चालू केली आहे असं सिताराम ढोले यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Weather Update Live Update : भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा कहर.

कर्ज घेऊन भातपिकाची लागवड केली. कापणीला आलेल्या भातपिकाची येत्या चार दिवसात कापणी करून....शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचं, असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलं. भंडारा जिल्ह्यात काल वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका बसलाय तो पवनी तालुक्यातील पहेला परिसरातील शेती पिकाला. वादळी वाऱ्यानं कापणीला आलेलं शेकडो हेक्टरमधील भातपीक अक्षरश: भुईसपाट झालं.

सोलापुरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली कारवाई

- सोलापुरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने केली कारवाई,अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह महिला अधिकाऱ्यावर कारवाई

- सोलापुरात सोलर सिस्टिम बनवण्यासाठी आठ हजार रुपयांची मागितली होती लाच

- अतिरिक्त कार्यकारी अभियंता सह तिघा जणांनी विरोधात एसीबीची कारवाई

- अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत पांडुरंग व्हनमाने,सहाय्यक अभियंता स्वाती सदानंद सलगर आणि रक्कम स्वीकारणारा खाजगी व्यक्ती योगीनाथ म्हेत्रे यांच्यावर करण्यात आली कारवाई

- सोलर व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराकडे सोलर सिस्टिम मंजुरीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी,मीटर बसवण्यासाठी व्हनमाने आणि सलगर यांनी केली होती पाहणी

- व्हनमाने यांनी पाच हजार रुपयांची तर सलगर यांनी तीन हजार रुपयांची तक्रारदाराकडे मागणी केल्याचं झालं निष्पन्न

एकीकडे मान्सून पूर्व पाऊस.. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असला, तरी अमरावतीच्या मेळघाट परिसरात आजही पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपला नाहीये.. मेळघाट परिसरात देखील पावसाची हजेरी लागली.. मात्र मेळघाट मधील खडीमल गावात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.. विहिरीने अजूनही तळ गाठला आहे.. त्यामुळे टँकरने विहिरीमध्ये पाणी सोडले जाते.. त्यानंतर गावातील नागरिक विहिरीत दोर टाकून पाणी वर काढतात.. गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाईचा सामना या खडीमल गावाला करावा लागतोय.. दरवर्षी थातूरमातूर उपाययोजना केल्या जातात.. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करून पाणीटंचाई संपवावी, अशीच मागणी अनेक वर्षापासून मेळघाटमधील आदिवासी करत आहेत.

Maharashtra Weather Update Live Update : शेगावमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस

शेगाव शहरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट अवकाळी पाऊस बरसला. दरम्यान अनेक ठिकाणी घरांची पडझड होवून झाडांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच काही भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

अवकाळी पावसाचा बसला फटका व्यापाऱ्यांना

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलेला आहे आज बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला पडून आहे कारण पाऊस पडल्यामुळे गिर्हाईक व्यापारीआणि पाठ फिरवली आहे

त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिऱ्हाईक नसल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांवर आणि व्यापाऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात आवक 469 इतकी झाली असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात माळ आलेला आहे

Maharashtra Weather Update Live Update : नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे घरांचे नुकसान

- भिवापूर तालुक्यातील चिखलापार महालगाव मांडवा बंजारा या गावांमध्ये काल अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने अनेक घराचं नुकसान झाले... तेच मौदा तालुक्यातील काही भागात झाड कोसळले.

- यात चिखलापार येथील निलेश खोडे, डोमाजी राऊत, रमेश गजबे महेश सोळंके, शोभा शंभरकर यांच्या घरावरील कौवलाचे छत शतीग्रस्त झाले, तेच काहींच्या घरावरील टिनाचे पत्रे उडून गेले..

- यामुळे घरात ठेवलेले अन्न धान्य सहित्याच नुकसान झालं,

- सायंकाळी नुकसान पाहणीसाठी भिवापूर सरपंच अतुल सहारे, यांनी तहसीलदार यांना माहिती दिली असता त्यांनीही महालगाव भागात पाहणी केली..

Maharashtra Weather Update Live Update : मावळात मेघगर्जनेसह पावसाचे आगमन

मावळात मेघगर्जनेसह पावसाचे आगमन. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फायदा होणार आहे.. चार महिने कोरडवाहू जमीन पडीत ठेवून तापवण्यासाठी ठेवण्यात आली होती. या पावसामुळे नांगरटी किंवा शेत तयार करण्यासाठी या पावसाचा उपयोग होणार आहे. शेतजमीन फळणी रोटरने पेरणी करण्यासाठी या पावसाचा उपयोग होणार आहे. सात जून म्हणजेच मिरगाच्या नंतर पेरणीला सुरुवात होणार आहे.

त्यामुळे बळीराजा आनंदीत आहे. तर अचान अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे...

Maharashtra Weather Update Live Update : नैसर्गिक आपत्तीत संपर्कासाठी जिल्हा प्रशासन आता आत्याधुनिक सॅटेलाईट फोन वापरणार

पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. नैसर्गिक आपत्तीत संपर्कासाठी जिल्हा प्रशासन आता आत्याधुनिक सॅटेलाईट फोन वापरणार आहे.. जिल्ह्यातील महसुल यंत्रणेसाठी १२ तर पोलिस प्रशासनासाठी १२ फोन आले आहेत. या सॅटेलाईट फोनचा वापर सर्व तहसील कार्यालय आणि पोलिस स्थानकात केला जाणार आहे. इमर सॅट असं याचं नाव असून, हे बीएसएनएल कंपनीचे सॅटेलाईट फोन आहेत. मोकळ्या जागेवरून काही क्षणात यावरून संपर्क करता येणार आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची हायटेक यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

Maharashtra Weather Update Live Update : ठाण्यात ढगाळ वातावरण

ठाणे..काल संध्याकाळी पासून कोसळणार्या पावसाने आज सकाळी विश्रांती. घेतली आहे. पण आज दिवसभर पाऊस हजेरी लावणार आहे. सकाळी पासूनच ढगाळ वातावरण आहे.

Maharashtra Weather Update Live Update : दापोलीत शहरात सखल भागात साचल पाणी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पावसाचा धुमाकूळ सुरु आहे या अवकाळी पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्याच पावसात शहरातील आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पाण्याचा विळखा बसला. तर काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला होता. शिवसृष्टी जवळील गटार या पावसात तुंबल्याने पावसाचे पाणी चक्क रस्त्यावर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवकाळी पावसातच दापोलीची बिकट परिस्थिती निर्माण झाली. नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जातेय.

Maharashtra Weather Update Live Update :सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रीपरीप

रात्रभर विश्रांती घेतलेल्या पावसाची सकाळपासून पुन्हा रीपरीप सुरू

जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाची रीपरीप

तर काल संध्याकाळपासून काही भागात विद्युत पुरवठा खंडित

काल संध्याकाळपासून विज गायब असल्याने नागरीकांची गैरसोय

तर पावसाच्या रीपरीपीमुळे शेतकऱ्यांची मान्सून पुर्व कामे खोळंबली

पहिल्याच दिवशी 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

यवतमाळ जिल्हा परिषदेत प्रशासकीय बदली प्रक्रिया सुरू असून पहिल्याच दिवशी 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यात कृषी, पाणीपुरवठा, बांधकाम, महिला व बालकल्याण तसेच सामान्य प्रशासन विभागाचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाही, यामुळे बदली पात्र कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. जिल्हा परिषद प्रशासनाने बदलांचे वेळ पत्रक तयार केले.पहिल्याच दिवशी सामान्य प्रशासन विभागातील विस्तार अधिकारी,सांख्यिकी तीन,15 वरिष्ठ सहाय्यकांची बदली करण्यात आली.

Maharashtra Weather Update Live Update : जालन्यात जवळपास दोन हजार हेक्टरवरील शेतमालांचे नुकसान

जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळीचा कहर पाहायला मिळतो . आठवड्याभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास दोन हजार हेक्टरवरील शेतमालाच नुकसान झालं आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतमालाच नुकसान जालना जिल्ह्यात झाल आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीमुळे जिल्ह्यात सात नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत तर जिल्ह्यात 87 जनावर देखील दगावली आहे. जालना जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.