उत्तराखंडच्या धामी सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकार आता मदरशामध्ये ऑपरेशन सिंदूरचा धडा देणार आहेत. भारतीय सैन्याचा पराक्रम आणि इतिहास मदरशांमध्ये शिकवला जाणार आहे.
MNS Live: अमित ठाकरे यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत...मनसे नेते अमित ठाकरे यांचा 24 मे रोजी वाढदिवस असतो, पण यंदा ते आपला वाढदिवस साजरा करणार नाही, याबाबतचे माहिती त्यांनी दिली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.
Jyoti Malhotra News : 'होय, मी पाकिस्तानच्या सूचनेनुसारच...'; ज्योती मल्होत्राने दिली अखेर कबुलीयूट्युबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिच्या चौकशीनंतर आता अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. अनेक धक्कादाक पुरावे समोर येत आहे. तिला पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तिने अखेर अखेर आयएसआयशी संबंधांची कबुली दिली असून शाकीरशी वारंवार चॅट केल्याचे म्हटलं आहे.
Mahavitaran Company in Solapur News : महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यातसोलापुरात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने पकडले असून अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह महिला अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. सोलापुरात सोलर सिस्टिम बनवण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह तिघा जणांनी मागितली होती. याप्रकरणी एसीबीने कारवाई केली असून अतिरिक्त कार्यकारी अभियंता भारत पांडुरंग व्हनमाने, सहाय्यक अभियंता स्वाती सदानंद सलगर आणि रक्कम स्वीकारणारा खाजगी व्यक्ती योगीनाथ म्हेत्रे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भाजपशासित राज्याचा मोठा निर्णयपहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूरमधून पाकिस्तानमध्ये घुसून मोठी कारवाई केली. ज्यात दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष करण्यात आले. याच ‘ऑपरेशन सिंदूर’चा समावेश पाठपुस्तकात होणार आहे. विशेष म्हणजे मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्याचा निर्णय भाजपच्या उत्तराखंड राज्यातील मदरसा शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे.
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनंतर थेट शिंदेंना एन्ट्रीनंतर 'सामना'तून चॅलेंजमंगळवारी (ता.20) राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली. मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आलेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. यानंतर आता छगन भुजबळ यांच्या एन्ट्रीनंतर 'सामना'तून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याच आलं असून चॅलेंज देण्यात आलं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? असे सवाल करण्यात आले आहेत.
Devendra Fadnavis News : अजितदादा पालकमंत्री असणाऱ्या जिल्ह्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालणारबीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची अशी चर्चा सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलावले जाणार आहे.
Narendra Patil News : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जासाठी पैशाची मागणीराज्यात मराठा तरूणांना रोजगार निर्मितीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. या महामंडळाने तब्बल एक लाखाहून अधिक बेरोजगार तरुण व्यावसायिक घडवण्यात यश आले आहे. मात्र, या मराठा तरुणांना गंडा घालण्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. महामंडळाचे कर्ज आणि व्याज परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली हजारो रुपये तरुणांकडून उकळत आहेत. या प्रकाराची महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दखल घेत थेट पोलीस ठाणे गाठलं आहे. नरेंद्र पाटील यांनी स्वतः याविरोधात तक्रार दिली आहे.
Maharashtra Live Updates : 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदराज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढला असून वादळी वाऱ्यांसह आणि मुसळधार पाऊस होत आहे. तर येत्या काही दिवसांत समुद्रात वादळी वारे आणि अति मुसळधार होण्याची शक्यता आहे. यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात मच्छिमारी न करता आपल्या बोटी किनाऱ्यावर दाखल करण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीही बंद करण्याच्या आदेश मत्स्यव्यवसाय विभागाकडून देण्यात आले आहेत. या कालावधीत मासेमारी करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही विभागाकडून देण्यात आला आहे.
Nitesh Rane News : सहाय्यक आयुक्त जगतापांना दणका? राणेंनी केली निलंबणाची कारवाई
आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे आता नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांना भोवले आहे. याप्रकरणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कारवाई केली आहे. प्र.दा. जगताप यांच्यावर ही कारवाई झाली आहे.