Sindhu River : सिंधुचा पाणी प्रश्न पेटला, भारताने पाणी रोखल्याने पाकिस्तानमध्ये पाणीबाणी; गृहमंत्र्याचे घर जाळले, जनता रस्त्यावर
GH News May 21, 2025 05:08 PM

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सिंधु नदीचे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद आता पाकिस्तानमध्ये दिसत आहे. येथील पाण्याचा प्रश्न भीषण झाला आहे. सिंधु नदीच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. भारताने पाणी रोखल्याने सिंधमध्ये गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती आहे. असंतोष इतका भडकला आहे की, आंदोलकांनी सिंधच्या गृहमंत्र्याचं घरच पेटवून दिले आहे. पाकमधील आंदोलक सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे. या आंदोलनात एक ते दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

पाण्यासाठी हिंसक आंदोलन

पाकड्यांची चोहो बाजूने कोंडी सुरू आहे. एकीकडे सिंधु नदीचे पाणी भारताने अडवले आहे. तर दुसरीकडे सरकारच्या सहा कालवे प्रकल्पाला सिंध प्रांतातील लोकांचा प्रचंड विरोध सुरू आहे. मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पाकिस्तानातील सिंध प्रांताचे गृहमंत्री जियाउल हसन लंजर यांचे नौशहरो जिल्ह्यातील घर आंदोलकांनी जाळले. त्यांच्या घराची मोठी नासधूस करण्यात आली. आंदोलकांच्या हाती यावेळी बंदुका होत्या. या बंदुकातून अनेकांनी हवेत गोळीबार केला. गृहमंत्र्याच्या घरातील काही लोकांना मारहाण करण्यात आली. आंदोलकांनी यावेळी शेकडो वाहनं पेटवून दिली.

बातमी अपडेट होत आहे…

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.