Indrayani : 'इंद्रायणी' मालिकेत नात्यांची कसोटी; गोपाळ इंदूचं प्रेम जिंकेल का? पाहा VIDEO
Saam TV May 21, 2025 06:45 PM

'इंद्रायणी' (Indrayani ) मालिकेत अलिकडेच गोपाळ इंदूजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. आता 'इंद्रायणी' मालिकेत इंदूचा वाढदिवस चांगला साजरा व्हावा यासाठी अधू आणि गोपाळ दोघेही इंदूसाठी खास गिफ्ट आणतात. अधू तिच्यासाठी खास तयार देखील झाला आहे. पण या क्षणांना अनपेक्षित वळण लागते जे मालिकेतील नात्यांच्या गुंत्यात नवे वादळ घेऊन येणार आहे.

'' मालिकेत अधू इंदूला वाढदिवसानिमित्त बाहेर घेऊन गेला आणि तेवढ्यात त्यांच्यावर हल्ला झाला ज्यामध्ये इंदूला वाचवताना अधूला इजा झाली. या गोष्टीचा आनंदीने मोठा मुद्दा केला असून तिने इंदुला घराबाहेर काढण्याची तयारी देखील केली आहे. व्यंकू महाराज इंदूची बाजू घेत तिला रोखण्याचा प्रयत्न करतात. पण इंदूने वचन पूर्ण करत प्रॉपर्टीचे आनंदीच्या नावावर केले आहेत, हे सत्य सगळ्यांसमोर येते.

'इंद्रायणी' मालिकेत पुढे व्यंकू महाराज आनंदीबाईंना एक असं मोठं सत्य सांगतात, ज्यामुळे आनंदीचं इंदूला घराबाहेर काढण्याचा प्लान फसतो. इंदू, अधू, आणि आनंदीबाई यांच्यातील नातेसंबंधांचा गुंता उलघडण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे गोपाळ आणि इंदूच्या नात्यात येणार गोडं वळण तर दुसरीकडे अधूच्या भावना या या गोष्टींवर मालिका फिरताना दिसतेय.

'इंद्रायणी' मालिकेने नुकताच 400 भागांचा यशस्वी टप्पा गाठला. इंदूच्या मालकीच्या प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्रे, आनंदीबाईचे दावे आणि कागद पत्रावर तिसऱ्या व्यक्तीची लागणारी सही हा सर्व गुंता कसा सुटणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. व्यंकू महाराजांची मध्यस्ती, इंदूला घराबाहेर काढण्याचा आनंदीचा प्रयत्न आणि इंदूचा हक्क हे सारेच ट्विस्ट प्रेक्षकांना गुंतवून ठेवतील.

'इंद्रायणी' मालिकेत आनंदीबाई अधूवर प्रमिलाशी लग्नासाठी दबाव टाकताना दिसणार आहे आणि त्यामुळे अधूचा गोंधळ आणखी वाढणार आहे. आनंदी बाईंची हा हट्ट अधूला नव्या पेचात टाकणार आहे. 'इंद्रायणी' मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.