आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 63 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना फार महत्त्वाचा आहे. दिल्लीसाठी हा सामना करो या मरो असा आहे. या अशा स्थितीत दिल्ली कॅपिट्ल्सला मोठा झटका लागला आहे. दिल्लीचा कर्णधार आणि अनुभवी ऑलराउंडर अक्षर पटेल या सामन्यातून बाहेर झाला आहे. अक्षर आजारी असल्याने त्याला या सामन्याला मुकावं लागला आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, दुष्मंथा चमीरा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि मुकेश कुमार.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह