MI vs DC : सूर्यकुमार आणि नमन.., मुंबईच्या विजयानंतर कॅप्टन हार्दिक नाव घेत थेट म्हणाला
GH News May 22, 2025 05:04 AM

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा प्लेऑफमध्ये धडक दिली. मुंबईने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 63 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर मात केली. मुंबई यासह प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. मुंबईने या सामन्यात 59 धावांनी विजय मिळवला. दिल्लीचं या पराभवासह या हंगामातील आव्हान संपुष्ठात आलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने टॉस जिंकत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या. मुंबईने दिल्लीसमोर 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं 18.2 ओव्हरमध्ये 121 धावांवर पॅकअप केलं.

मुंबईसाठी सूर्यकुमार यादव आणि नमन धीर या जोडीने शेवटच्या 12 बॉलमध्य्ये 48 धावा जोडल्या. त्यामुळे मुंबईला 180 धावांपर्यंत पोहचता आलं. त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली. जसप्रीत बुमराह आणि मिचेल सँटनर या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. मुंबईच्या या विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आनंदी होता. हार्दिकने विजयानंतर कुणाला श्रेय दिलं? तसेच तो काय म्हणाला? जाणून घेऊयात.

हार्दिक पंड्या काय म्हणाला?

“”जसप्रीत बुमराह हा असा खेळाडू आहे जो खेळात नियंत्रण आणि परिपूर्णता आणतो. बुमराह असा बॉलर आहे की जो मला वाटेल तेव्हा बॉलिंग टाकू शकतो. बुमराह माझं काम फार सोपं करतो. आम्ही या पीचवर 160 धावा केल्या असत्या तर मी आनंदी असतो. मात्र सूर्यकुमार यादव आणि नमन धीर या दोघांनी बॅटिंग केली ते कौतुकास्पद होतं. विशेष करुन नमनने या अवघड खेळपट्टीवर सहजरित्या फटकेबाजी केली”, असं म्हणत पंड्याने सू्र्या आणि नमनच्या खेळीचं कौतुक केलं.

सामन्याचा धावता आढावा

मुंबईची काही खास सुरुवात राहिली नाही. माजी कर्णधार रोहित शर्मा, रायन रिकेल्टन आणि विल जॅक्स आऊट झाले. त्यामुळे मुंबईचा स्कोअर हा 3 आऊट 58 असा झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 55 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर तिलक वर्मा 27 रन्सवर आऊट झाला. तर हार्दिकने 3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

त्यानंतर सूर्यकुमार आणि नमन या दोघांनी पलटणला 180 धावांपर्यंत पोहचवलं. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 21 बॉलमध्ये 57 रन्सची पार्टनरशीप केली. विशेष म्हणजे शेवटच्या 12 बॉलमध्ये दोघांनी 48 धावा केल्या. नमन धीर याने 8 चेंडूत 24 धावा केल्या. सूर्याने 43 बॉलमध्ये नॉट आऊट 73 रन्स केल्या. सूर्याला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.