How to make veg appam in 15 minutes: तुम्ही डाळी अप्पे तर खाल्ले असेलच पण कधी व्हेजी अप्पे ट्राय केले का? नसेल तर चला आज जाणून घेऊया व्हेजी अप्पे कसे बनवतात आणि कोणते साहित्य लागते.
व्हेजी अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
रवा- १ कप
दही - १/२ कप
पाणी - १/२ कप
भाज्या - १/३ कप
मीठ - १ टीस्पून
हिरव्या मिरच्यांची पेस्ट - १ टीस्पून
तूप - १ टीस्पून
मोहरीचे दाणे - १ टीस्पून
उडदाची डाळ - १ टीस्पून
हिंग - १ टीस्पून
कोथिंबीर
व्हेजी अप्पे बनवण्याची कृती
व्हेजी अप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी रवा घ्या. त्यात दही आणि मीठ मिसळा. नंतर चमच्याच्या मदतीने चांगले मिसळा. नंतर सर्व भाज्याचे चौकोणी तुकडे करा आणि मिक्सरमध्ये बारीक करा. नंतर बारीक भाज्या रव्याच्या मिश्रणात टाका. न
नंतर मिरची -आलं लसून पेस्ट मिसळा. नंतर तुपाचा तडका या सारणावर टाका. थोडा सोडा टाका आणि चांगले मिक्स करा. अप्पे पात्ररम करून त्यात मिश्रण टाका. १० मिनिटे शिजू द्या टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा,