MI vs DC Live: OUT or NOT-OUT? अभिषेक पोरेच्या विकेटवरून सुरू झालाय वाद, मुंबई इंडियन्सवर नेटिझन्स उपस्थित करतायेत सवाल
esakal May 22, 2025 01:45 PM

IPL 2025 Mumbai Indians vs Delhi Capitals Marathi Update: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ च्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सला बॅकफूटवर फेकले आहे. पण, अभिषेक पोरेलच्या विकेटवरून वाद सुरू झाला आहे.

रोहित शर्मा ( ५) सकट मुंबईची आघाडीची फळी आज फार काही कमाल करू शकली नाही. रायन रिकेल्टन ( २५) व विल जॅक्स ( २१) यांना शांत ठेवण्यात दिल्लीच्या गोलंदाजांना यश आले. तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव हेही सुरुवातीला चाचपडताना दिसले. तिलक २७ धावा करून बाद झाला. पण, सूर्याने शेवटच्या षटकांत दमदार फटकेबाजी केली. त्याने ४३ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली, तर नमन धीरने ८ चेंडूंत २४ धावा कुटल्या. मुंबईने ५ बाद १८० धावांपर्यंत मारली मजल.

दिल्ली कॅपिटल्सची सुरुवातही काही खास झाली नाही. दीपक चहरच्या दुसऱ्या षटकात सरळ षटकार मारण्याच्या प्रयत्नात फॅफ ड्यू प्लेसिस ( ६) मिचेल सँटनरच्या हाती झेल देऊन परतला. त्याच्यासाठी सँटनरला लाँग ऑनवर उभं केलं होतं. पुढच्या षटकात ट्रेंट बोल्टने मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली. लोकेश राहुल ( ११) झेलबाद झाला. विल जॅक्सच्या वळणाऱ्या चेंडूंनी DC च्या फलंदाजांना अचंबित केले. अभिषेक पोरेल ( ६) असाच फसला अन् यष्टिचीत होऊन माघारी गेला. दिल्लीने २७ धावांत तीन फलंदाज गमावले.

कर्णधार हार्दिकने कसोटीसारखी फिल्डिंग लावून दिल्लीच्या फलंदाजांवर दडपण निर्माण केले. विपराज निगमने जॅक्सच्या त्या षटकात ६,४,४,१ अशा धावा झोडल्या. रोहितने त्याच विपराजचा झले टाकला आणि मुंबईचे फॅन्स टेंशनमध्ये गेले. दरम्यान, पोरेलच्या विकेटवरून वाद सुरू झाला आहे. पोरेलचा पाय क्रिजच्या आत जमिनिवर टेकलेला होता असे अनेकांचे म्हणणे आहे आणि तरीही तिसऱ्या अम्पायरने बाद दिल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.

प्रतिस्पर्धीच्या मैदानावर सर्वाधिक धावा
  • ५३७ - लोकेश राहुल ( वानखेडे)

  • ५३४ - विराट कोहली ( दिल्ली)

  • ४९६ - विराट कोहली ( वानखेडे)

  • ४८६ - विराट कोहली ( हैदराबाद)

  • ४८३ - रोहित शर्मा ( कोलकाता)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.