Maharashtra Live Updates: आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी
Sarkarnama May 22, 2025 05:45 PM
राजेंद्र हागवणे यांची राष्ट्रवादी काँग्रसमधून हकालपट्टी

सून वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीराजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सगळ्या पदावरून त्यांना काढून टाकण्यात आला आहे . जी घटना त्यांच्या घरात घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी

आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी चक्क लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आलाय. त्यामुळे आदिवासी समाजाच्या संघटना खवळल्या असून त्यांनी आता थेट राज्यपालांकडे धाव घेतली आहे. शासनाने आदिवासी विकास विभागाच्या वाट्याच्या कोट्यावधी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी हस्तांतरित केलाय.

ज्योती मल्होत्राने केला होता मुंबईचा चारवेळा दौरा

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राने केला होता मुंबईचा चारवेळा दौरा, लालबागच्या राजाच्या गर्दीचे काढलेले व्हिडीओ देखील काढल्याचे समोर आले आहे. ज्योती ही आता हरियाणा पोलिसांच्या ताब्यात असून तिला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

वैष्णवी हगवणेची आत्महत्याच, गळफास घेतल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट

पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये नेमकं काय आलं आहे याबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त यांनी दिली आहे. ते म्हणाले, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं कारण सांगितले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स राखून ठेवले आहेत.

Anil Gote : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात दहा कोटी, आमदारांना वाटण्यासाठी आणल्याचा अनिल गोटेंचा आरोप

धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील आमदाराच्या सहाय्यकाच्या खोलीमध्ये दहा कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा भांडाफोड माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. या खोलीबाहेर गोटे यांनी ठिय्या केला तर शिवसैनिकांनी या खोलीला टाळे लावले. बुधवारी रात्री उशिरा येथे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी दाखल झाले. त्यांच्या समक्ष खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा तेथे रोकड आढळली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.