आयपीएल 2025 स्पर्धेतून लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेतील औपचारिक सामने खेळत आहे. पण शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. पण टॉप 2 मधील स्थान कायम ठेवण्यासाठी विजय महत्वाचा आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सला या सामन्यात काहीही करून मिळवावा लागणार आहे. गुजरात टायटन्सचे 18 गुण आणि +0.795 नेट रनरेट असून गुणतालिकेत टॉपला आहे. प्लेऑफचं गणित सुटलं असलं तरी टॉप 2 मध्ये राहण्यासाठी उर्वरित गणित सोडवणं गरजेचं आहे. कारण हा सामना गमावला तर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला टॉप 2 मध्ये येण्याची संधी मिळेल. या दोन्ही संघांचे प्रत्येकी 17 गुण आहेत. उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर टॉप 2 मधील जागा पक्की होऊ शकते. दरम्यान, नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि शुबमन गिलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
शुबमन गिल म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करू, चांगली खेळपट्टी दिसतेय. लक्ष्य गाठणे चांगले राहील. पात्रता फेरीत आम्हाला गती हवी आहे, हे दोन्ही सामने तितकेच महत्त्वाचे असणार आहेत. आम्ही एकमेकांचे कौतुक करण्याची पद्धत उत्तम आहे, गोलंदाजांना कोण मारेल यावर आमच्यात चर्चा होत नाही. आम्ही फक्त सकारात्मक हेतूने खेळतो आणि क्षणात टिकून राहतो. संघात कोणताही बदल नाही.
ऋषभ पंत म्हणाला की, मी प्रथम गोलंदाजी केली असती, चांगली विकेट दिसते. जेव्हा तुम्ही आधीच बाहेर असता तेव्हा आव्हान असते, परंतु आम्हाला क्रिकेट खेळण्याचा अभिमान आहे. एक संघ म्हणून, आम्ही वेगवेगळे पर्याय वापरून पाहत आहोत जे स्वतःला जिंकण्याची सर्वोत्तम संधी देतात. पुढील हंगामाची तयारी करण्यास मदत करू शकेल असे काहीही. आकाश दीप संघात येत आहे आणि आमच्या संघात आणखी काही बदल केले आहेत.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरोर्के.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.