Maharashtra Live Updates: सलमान खानच्या इमारतीत अज्ञात व्यक्तीची घुसखोरी, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Sarkarnama May 22, 2025 09:45 PM
Salman Khan News : इमारतीत अज्ञात व्यक्तीची घुसखोरी

अभिनेता सलमान खान राहत असलेल्या इमारतीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तातडीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर जितेंद्र कुमार सिंह असे संबंधित व्यक्तीचे नाव असल्याचे समजले. तो छत्तीसगढचा रहिवासी आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सलमान खानला यापूर्वी जीवे मारण्याची धमकी अनेकदा आली होती. यापार्श्वभूमीवर घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Vaishnavi Hagawane Death Case: निलेश चव्हाण यांच्याकडे बाळ?

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यु प्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात आता वैष्णवी यांचे बाळ कुठे आहे असा प्रश्न विचारण्यात येत होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांना बाळ कस्पटेंकडे सोपवण्याच्या सूचना केल्या होत्या. वैष्णवीचे बाळ हे वैष्णवीच्या पतीचे बिझनेस पार्टनर असलेल्या निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा केला होता. दरम्यान या बाळाला अनोळखी व्यक्तींनी कस्पटे कुटुंबियांकडे सोपवले आहे. एका अज्ञात व्यक्तीनं वैष्णवीचं बाळ आमच्याकडे दिलं, असे कस्पटे कुटुंबियांनी सांगितलं.

Pahalgam Terror Attack Case :'ऑपरेशन सिंदूर'ला यश, पण हल्लेखोरांचा खात्मा कधी?

Pahalgam Terror Attack Case : जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, या घटनेला आज एक महिना पूर्ण होत आहे. पण अद्याप हल्लेखोर सापडलेले नाहीत. पहलगाम हल्लाचा भारताने 'ऑपरेशन सिंदूर'राबवून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे.

राजेंद्र हागवणे यांची राष्ट्रवादी काँग्रसमधून हकालपट्टी

सून वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीराजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सगळ्या पदावरून त्यांना काढून टाकण्यात आला आहे . जी घटना त्यांच्या घरात घडली ती मानवतेला काळीमा फासणारी आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी

आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी चक्क लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आलाय. त्यामुळे आदिवासी समाजाच्या संघटना खवळल्या असून त्यांनी आता थेट राज्यपालांकडे धाव घेतली आहे. शासनाने आदिवासी विकास विभागाच्या वाट्याच्या कोट्यावधी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी हस्तांतरित केलाय.

ज्योती मल्होत्राने केला होता मुंबईचा चारवेळा दौरा

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राने केला होता मुंबईचा चारवेळा दौरा, लालबागच्या राजाच्या गर्दीचे काढलेले व्हिडीओ देखील काढल्याचे समोर आले आहे. ज्योती ही आता हरियाणा पोलिसांच्या ताब्यात असून तिला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

वैष्णवी हगवणेची आत्महत्याच, गळफास घेतल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट

पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये नेमकं काय आलं आहे याबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त यांनी दिली आहे. ते म्हणाले, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी हँगिंगचं कारण सांगितले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी जे ॲडव्हान्स मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांनी काही पार्ट्स राखून ठेवले आहेत.

Anil Gote : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात दहा कोटी, आमदारांना वाटण्यासाठी आणल्याचा अनिल गोटेंचा आरोप

धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील आमदाराच्या सहाय्यकाच्या खोलीमध्ये दहा कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा भांडाफोड माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. या खोलीबाहेर गोटे यांनी ठिय्या केला तर शिवसैनिकांनी या खोलीला टाळे लावले. बुधवारी रात्री उशिरा येथे पोलिस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी दाखल झाले. त्यांच्या समक्ष खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा तेथे रोकड आढळली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.