65784
माजी विद्यार्थी १७ वर्षांनी आले एकत्र
तोंडवली बीएड महाविद्यालयाचा स्नेहमेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २३ ः सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचालित तोंडवली येथील बीएड महाविद्यालयाचे २००७-०८ बॅचचे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्यानिमित्ताने १७ वर्षानंतर एकत्र आले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय सैन्यातील सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर वीरांच्या व हयात नसलेल्या मित्रांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करत, दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन संस्थाध्यक्ष वसंत सावंत यांच्या हस्ते करून करण्यात आली. यावेळी संचालिका वर्षा सावंत, माजी प्राचार्य स. प. गर्जे, प्राचार्य सच्चिदानंद कनयाळकर, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, प्रा. विनायक जमदाडे, सचिन राणे, मिलिंद सावंत, मुख्य आयोजक सचिन पाटकर, ध्वजेंद्र मिराशी, अमोल वाढोकर, विशाल कासार आदी उपस्थित होते. डॉ. स. प. गर्जे यांनी आज सतरा वर्षानंतर आपण सर्वजण उपस्थित राहून ‘गेट टुगेदर’ केलात यातूनच आपली मैत्री अजून घट्ट होणार आहे, असे सांगितले.
आज तुम्ही चांगले विद्यार्थी घडवलात तर तुमचेही नाव विद्यार्थी पुढे काढतील, असे अध्यक्षीय भाषणात वसंत सावंत म्हणाले. संचालिका वर्षा सावंत, प्राचार्य सच्चिदानंद कनयाळकर, माजी विद्यार्थी नितीन बांबर्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळेस उपस्थित मान्यवरांचा माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी ध्वजेंद्र मिराशी, सचिन पाटकर, अमोल वाढोवकर, विशाल कासार, नितीन बांबर्डेकर, प्रशांत जाधव, अमोल पाटील, जयसिंग राणे, नितीन वरुणकर, श्रीमती सिमरन कोदे, प्रगती सावंत, दर्शना सावंत, पूनम जाधव, स्मिता खानविलकर, सारिखा जाधव, दीप्ती जाधव, आरती महाडिक, योगिनी शेटये, छाया जाधव, नमिता गावडे आदी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्वजेंद्र मिराशी यांनी तर सूत्रसंचालन सचिन पाटकर व आभार अमोल वाढोकार यांनी मानले.