पलूस : तालुक्यातील एका गावात शेतमजुराने आपल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती व पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे, की (ता. १९ एप्रिल) रोजी रात्री १० वाजलेनंतर व त्यानंतर दोनवेळ ता. १ मेपर्यंत संशयित आरोपी याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी आपल्या आजीजवळ झोपली असताना, तिला दुसऱ्या खोलीत नेऊन, जवळ झोपण्यास घेऊन, दमदाटी करून लैंगिक अत्याचार केले.
याबाबत कोणालाही काही एक सांगितले, तर मी तुला मारून टाकीन व मीही जीव देईन, अशी धमकी दिली. पलूस पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत आरोपीस गुन्हा दाखल करून, त्यास अटक केली आहे.