Maharashtra News Live Updates: शेतकऱ्यांना आठ दिवसात कृषी कर्ज वाटप करा
Saam TV May 23, 2025 11:45 PM
शेतकऱ्यांना आठ दिवसात कृषी कर्ज वाटप करा

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तोंडावर असून बँकांनी १५०० कोटींचे कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना ही फक्त आतापर्यंत १५० कोटी रुपयांचे कृषी कर्ज शेतकऱ्यांना वाटप केलेय .. त्याची गती तात्काळ वाढवून शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे , तसेच बी बियाणे , खत रास्त भावात मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासह विविध मागण्या घेऊन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले , आणि त्यांच्या मागण्याच्या संदर्भात निवेदन दिलेय .. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केलीय .. जर येत्या आठ दिवसांत बँकांनी शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटप केले नाही तर जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ने दिलाय ..

सोलापुरात घरगुती हिंसावरून विवाहित महिलेला बेदम मारहाण

- दीर आणि जाऊ यांच्याकडून करण्यात आली मारहाण..

- टेंभुर्णी येथील विवाहित महिलेला मारहाण झाल्यानंतर गेल्या दहा दिवसापासून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात घेत आहे उपचार..

- चित्रा सतीश भोसले असं मारहाण झालेल्या विवाहित महिलेचे नाव..

- दीर संतोष भोसले, निलेश भोसले, जाऊ निलीता संतोष भोसले, पूजा निलेश भोसले यांनी मिळून काठी, रॉड याच्या साह्याने मारहाण करत विष पाजण्याचा केला प्रयत्न..

- चित्रा भोसले यांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारल्याच्या मारल्याचे वण आले दिसून..

- चित्रा भोसले यांचा मारहाणीत कानाचा पडदा फाडल्याचा नातेवाईकांचा आरोप..

- टेंभुर्णी पोलीस ठाण्यात याबाबतीत फिर्याद दिल्यानंतर 14 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला..

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ नांदगावमध्ये तिरंगा रॅली

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेर्धात तसेच भारतीय लष्कराने पाकीस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या समर्थनात नाशिकच्या नांदगाव येथे आज देशभक्त नागरीकांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली,या रॅलीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी,महिला तसेच माजी सैनिक सहभागी झाले होते.

सततच्या पावसामुळे भुसावळ तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात सर्वात जास्त कांदा लागवडी करण्यात येते मात्र गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. भुसावळ तालुक्यासह परिसरामध्ये उन्हाळी कांदा आता काढणीला सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदे काढून ठेवले व काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदे शेतातच आहेत

नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप

नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मागील अकरा दिवसांपासून पावसाचा सपाटा सुरू आहे. आजही दुपारनंतर नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.

कोर्टबाहेर भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांशी वादावादी

भाजपच्या महिला पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची.

आंदोलन करताना गेटवरून बाजूला करताना महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये वाद.

आंदोलन करताना आम्हाला अडवू नका महिला कार्यकर्त्यांची मागणी.

तर कोर्टाच्या गेटच्या बाहेर पोलिसांकडून दोरखंड लावत बंदोबस्त.

राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या दोघांविरोधात तपासात गंभीर आरोप उघड झाल्याने, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७ दिवसांपेक्षा जास्त पोलीस कोठडीची मागणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जालन्यात वारंवार वीज खंडित; शिवसेना शिंदे गटाचा महावितरणला इशारा

गेल्या काही दिवसांपासून जालना शहरासह परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येची दखल घेत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली असून, येणाऱ्या आठ दिवसांत समस्या सोडवण्यात आली नाही, तर 'शिवसेना स्टाईल'ने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांनी महावितरणला दिला आहे.

पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात वाढ, दोन्ही बाजूची वाहतूक बंद

मान्सून पूर्व पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात वाढ.

राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने बंधाऱ्यावरची वाहतूक केली बंद.

गेली चार दिवस कोल्हापुरात पडतोय मुसळधार पाऊस.

दुपारी अडीच वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक केली बंद.

एमएमआरडीए वसाहतीत अवैध पार्किंग प्रकरणी पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल

कुर्ला विभागातील कुरेशी नगर येथील एमएमआरडीएच्या वसाहत परिसरात अवैध वाहन पार्किंगचा व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अंजुम शेख, रफिक शेख आणि सोनू शेख या पिता-पुत्रांविरुद्ध चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती इंदापूर दौंड मध्ये पावसाची संततधार...

पुण्याच्या बारामती सह इंदापूर दौंड आणि पुरंदरच्या भागांमध्ये आज सकाळपासून पूर्व मौसमी पावसाची संततधार सुरू झालेली आहे. काल सायंकाळी आणि मध्यरात्री पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आज सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

MIDC: तासवडे एमआयडीसीत 6 कोटीचे कोकन पकडले

सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीत सापडले 1370 ग्रॅम कोकेन सापडले

कंपनीत बेकायदेशीर कोकेन लपवले असल्याच्या माहितीवरून पोलिसांचा छापा

पाच संशयितांना घेतले ताब्यात

तळबीड पोलीसांनी केली कारवाई

गेले चार वर्ष रॅकेट सुरु असल्याची माहिती

तेलगंणामध्ये कोकेनची विक्रीसाठी केली जात होती

Solapur News: सोलापूरच्या मनगोळी येथे अवकाळी पावसाने खरबुजाचे मोठे नुकसान

शेतकरी प्रभाकर पाटील यांच्या शेतातील पिकांचे झाले मोठे नुकसान

शेतकरी प्रभाकर पाटील यांनी शेतात खरबूज पीक केलं होती लागवड

मात्र अवकाळी पाऊसामुळे लाखों रुपयांचे झाले नुकसान

पिकाचे पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्याची मागणी

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं

मंत्री छगन भुजबळ साईदरबारी दाखल झाले आहेत.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ साईंच्या चरणी लिन...

छगन भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात आलं आहे.

इंदापूर बस स्थानकावर दोन गटांत तुफान राडा....इंदापूर पोलिसांनी दाखल केला ११ जणांविरोधात गुन्हा

पुण्याच्या इंदापूर बस स्थानकावर दोन गटांत तुफान हाणामारी झालीय. प्रवाशांसमोरच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. इंदापूर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप हा वाद आटोक्यात आणला. या प्रकरणी इंदापूर पोलिसात आता 11 जणांना विरोधात सामाजिक शांतता बिघडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या वादाच नेमक कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाकडून गोळीबार

बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी आले होते चोरटे

सुरक्षारक्षकाने चोरट्यांच्या दिशेने केला गोळीबार

नेकनूर पोलिसांची पोलिसांची घटनास्थळी धाव

वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

वैभववाडी तालुक्यामधील करुळ घाटात आज सकाळी दरड कोसळल्याने कोल्हापूर कडे जाणारी घाटातील वाहतूक पुर्णता ठप्प झाली आहे. सध्या भुईबावडा घाटमार्गे वाहतूक वळवली असून करूळ घाटातील दरड हटवण्याचे काम सुरू आहे.

निलेश चव्हाण याच्यावर कस्पटे कुटुंबीयाला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला- पोलिस उपआयुक्त

वैष्णवी यांचा मुलगा हगवणे याने निलेश याच्याकडे दिला होता तेव्हा निलेश ने त्याच्याकडील पिस्तूल कस्पटे कुटुंबीयावर रोखली होती त्यामुळे वारजे पोलिस ठाण्यात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

निलेश याचे हगवणे यांच्यासोबत कौटुंबिक संबंध होता

आपल्याकडे जी तक्रार दिली आहे त्यावरून कलम लावले आहेत

कस्पटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अपहरणाचा उल्लेख तक्रारीत केलेला नाही

Nashik News: नाशिक कुंभमेळ्यात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस शाहीस्नान घालण्याची मागणी

- महिला आखाड्याच्या प्रमुख त्रिकाल भवंता सरस्वती महाराज यांची मागणी

- तसेच महिला आखाडयासह शाही स्नानासाठी महिला आखाड्याला स्वतंत्र व्यवस्था करण्याची केली मागणी

- गोदावरी नदीमुळे कुंभ होतो, त्यामुळे गोदावरी नदी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे

- तर महाराष्ट्रासह देशातील महिलांना आर्थिक समृद्ध केलं पाहिजे

- पुणे हुंडाबळी प्रकरणावर प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची केली मागणी

Nashik News: जिंदाल कंपनीला लागलेली आग अखेर नियंत्रणात

- धोका पूर्णपणे टळला, फक्त कूलिंग ऑपरेशन सुरू असल्याची अग्निशमन अधिकाऱ्यांची माहिती

- प्रोपेन गॅस टाकी पूर्ण सुरक्षित मात्र मोठे प्लॅन्ट जळून खाक

- पेट्रोलियमचे कच्चे पदार्थ असल्याने भडकत होती आग, फोमचा करावा लागत होता मारा

Nagpur News: खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या नागपूर विभागाची तयारी पूर्ण

नागपूर विभागात 4 प्रमुख पिके घेतली जातात त्यामध्ये धान, कापूस, सोयाबीन आणि तूर आहेत

नागपूर विभागाच सरासरी शेतीच क्षेत्र 19 लक्ष 14 हजार हेक्टर एवढं आहे

यावर्षी कृषी विभागाने 20 लाख 11 हजार हेक्टरचे नियोजन केलं आहे यामध्ये कापसाचं प्रस्तावित क्षेत्र 6 लाख 39 हजार हेक्टर

सोयाबीन 2 लाख 22 हजार हेक्टर, धानाच्या क्षेत्र नागपूर विभागात सर्वात जास्त 8 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्र, यातील  तुर 1 लाख 73 हजार हेक्टर एवढे नियोजन केलं आहे

Ajit Pawar: अजित पवार आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी कसपटे कुटुंबीयांची घेणार भेट

अजित पवार आज संध्याकाळी कोल्हापूर दौरा करून पुण्यात येतील

आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी अजित पवार कस्पटे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेणार आहेत

Badlapur: बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

74 किमी लांबीची पाईपलाईन आणि 14 जलकुंभ उभारले जाणार

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय

बदलापूरचा 2056 पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी

Anchor : वाढत्या लोकसंख्येमुळे बदलापूर शहरात होत असलेली पाणीबाणी अखेर संपणार आहे. कारण राज्य सरकारने नगरोत्थान योजनेतून बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केलीय. यासाठी आमदार किसन कथोरे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे प्रयत्नशील होते

Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेप्रकरणी पोलिस उपायुक्त माध्यमांशी बोलणार

निलेश चव्हाण बाबत पुणे शहर पोलिस उपायुक्त ११.३० वाजता माध्यमांशी बोलतील

Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणेच्या बाळाची प्रकृती बिघडली

वैष्णवी हगवणेच्या बाळाला काल त्याच्या आजी-आजोबांकडे सोपवण्यात आले. बाळाची प्रकृती बिघडल्याची माहिती आता समोर आली आहे. बाळाला घेऊन त्याचे नातेवाईक रुग्णालयात गेले आहेत.

Pune: पुणे शहरात सकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरूच

पुणे शहरातील सर्वदूर पहाटेपासून पावसाची संतधार

काल रात्री काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज सकाळपासून शहरात संतधार सुरूच

पुणे शहरात पुढील २ दिवस हवामान विभागाने दिला आहे अलर्ट

Ratnagiri Unseasonal Rain: पावसाचा रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट

गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 103 मिलिमीटर पाऊस

गुहागर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 190 मिलिमीटर पाऊस

त्या खालोखाल लांजा तालुक्यात 128, रत्नागिरी तालुक्यात 124, संगमेश्वर तालुक्यात 116 मिलिमीटर पाऊस

23 ते 26 मे किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

किनारी भागात 50 ते 60 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज

समुद्र खवळलेला राहणार, किनारपट्टी भागात नागरिकांनी न जाण्याचे आवाहन

23 ते 26 मे पर्यत मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मज्जाव

महाराष्ट्र विधानमंडळाची अंदाज समितीची आज तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक

वादग्रस्त ठरलेल्या या अंदाज समितीच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून

विधानमंडळ अंदाज समितीच्या कार्यक्रमालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी या एसआयटी चौकशी वरती आपला विश्वास नसल्याचे म्हटले

तुकाराम मुंढे त्याचबरोबर प्रवीण गेडाम तसेच धुळे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यातील अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी

Nandurbar: नंदुरबारचे कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार सलग पाच दिवस बंद

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसानं थैमान घातला आहे त्यातच पुन्हा एकदा हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्याला येल्लो अलर्ट जारी केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून सलग पाच दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला असून याचा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे एकीकडे अवकाळी पावसाचा थैमान तर दुसरीकडे बंद असलेल्या बाजार समितीमुळे शेतीमाल विकायचा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. ..

सोलापूर शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई, बुलेटसह 46 वाहनांवर करण्यात आली कारवाई

- रस्त्यावरून बेधडकपणे जादा आवाज करणारे सायलेन्सर बसवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर वाहतूक शाखेकडून करण्यात आली कारवाई

- सोलापुरातील संत तुकाराम चौक येथील वाहतूक शाखेकडून अचानक कारवाई करत 22 हजार रुपयांचा करण्यात आला दंड

- सोलापुरातील दोन ठिकाणी शहर वाहतूक शाखेकडून दहा बुलेटवर कारवाई करत सायलेन्सर करण्यात आले जप्त

- वाहतूक शाखेकडून मल्टी हॉर्न वाजवणारे वाहन,विना लायसन,फॅन्सी नंबर प्लेट,विना नंबर प्लेट अशा वाहनांवर करण्यात आली कारवाई

Matheran: माथेरानचा 175 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा

माथेरान 1850 या दिवशी स्थापन झालेलं सर्वांचं लाडकं पर्यटनस्थळ माथेरान काल म्हणजेच 175 वर्षांचं झालं...! या खास दिवशी माथेरानमध्ये जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आकाश प्रकाशमय झालं! "I LOVE माथेरान" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, आणि नागरिकांपासून पर्यटकांपर्यंत प्रत्येकजण या क्षणाचा आनंद लुटत होता.निसर्गरम्य माथेरान, ज्याचं सौंदर्य आणि शांतता दरवर्षी लाखो पर्यटकांना भुरळ घालतं – त्याच्या 175 व्या वाढदिवसाला उपस्थित राहणं ही अनेकांसाठी आठवणींची पर्वणी ठरली!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने घेतली काहीशी विश्रांती

1 ते 22 मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात ११६ मिमी पावसाची नोंद

या मान्सूनपूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्यातील 142 गावात नुकसान

यामध्ये वीज पडून दोन व्यक्तींचा तर 57 जनावरांचा मृत्यू

जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार में महिन्यात एकूण 80 घरांची पडझड झाली असून 630 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

6 मे रोजी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील करिष्मा विकास तांबवे यांचा तर 19 मे रोजी माढा तालुक्यातील बाळासाहेब माणिक पाटील यांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू

1 ते 22 मे दरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वीज पडल्याने जिल्ह्यातील 14 लहान तर 43 मोठे अशा एकूण 57 पशुधन दगावले

याशिवाय 80 घरांची अंशतः पडझड झाली.

तसेच 1557 शेतकऱ्यांचे 630 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, आंबा यासारख्या पिकांचे नुकसान झाले.

दरम्यान ही प्राथमिक अहवालतील माहिती असून नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ संबंधितांना मदत मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणींच्या तारखा घोषित करण्यासाठी अखेर १ जूनचा मुहूर्त

नाशिक -

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणींच्या तारखा घोषित करण्यासाठी अखेर १ जूनचा मुहूर्त

- १ जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १३ आखाड्यांच्या २६ प्रतिनिधींची होणार बैठक

- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आखाड्यांचे प्रतिनिधी, नाशिकमधील साधू महंतांची नाशिकमध्ये बैठक

- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला येणार वेग, बैठकीत कुंभमेळ्याचे स्वरूप होणार स्पष्ट

- सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या पर्वणींच्या तारखांची देखील होणार घोषणा

- पर्वणींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्याच्या अनुषंगाने येणारे साधू, महंत, भाविकांची गर्दी, वाहतूक याचं नियोजन केलं जाणार

दीड लाखाची लाच घेताना वीज अभियंताव इलेक्ट्रिशन ताब्यात

वरुड येथे लाचलुचपत विभागाची कारवाई..

महावितरणच्या कंत्राटदाराला मागितली होती लाच.

महेश दुपारे, आणि शरद बेलसरे अशी आरोपींची नावं आहेत..

महेश दुपारे याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे..

या संदर्भात वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे..

अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली दौऱ्यावर, पोलीस मुख्यालयाचे करणार उद्घाटन

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस हे पहिल्यांदाच सांगलीत येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.सांगली पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे फडणवीस यांच्या हस्ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उदघाटन होणार आहे. यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची बैठक देखील होणार आहे.पोलीस मुख्यलयाच्या उदघाटनानंतर भाजप कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न होणार आहे.यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार आहेत,यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

कराड चिपळूण महामार्गांवरची वाहतूक ठप्प

पाटण तालुक्यातील वाजेगाव गावच्या हद्दीत वाहन रस्त्यावर असलेल्या चिखलात अडकले

रस्त्याचे काम सुरु असल्याने ठेकेदाराकडून हलगर्जीपणा

सकाळपासून दोन तास वाहतूक ठप्प

रस्त्याचे काम संथगतीने सुरु, ठेकेदाराची मनमानी नागरिकांना त्रास..

सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट अतिवृष्टीचा इशारा

गेले तीन दिवस मान्सूनपूर्व पावसाने कोकणात धुमाकूळ घातला आहे.

पुढच्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत खराब हवामानाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

नागरिकांनी सतर्क राहव असा इशारा देण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट असल्याने जोरदार पाऊस, वादळ सदृश्य परिस्थिती राहण्याची शक्यता आहे

त्यामुळे मच्छीमारांनी खबरदारी घ्यावी असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

हगवणे कुटुंबीयांनी निर्लज्जतेपणाचा कळस गाठला

वैष्णवी हगवणे हिने 16 मे ला आत्महत्या केल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हरवणे हे फरार झाले होते.

मात्र वैष्णवीच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी राजेंद्र हगवणे त्यांच्या काही मित्रमंडळी सोबत तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये राजेंद्र हगवणे आणि त्याचे काही मित्र मंडळी हॉटेलमध्ये मटणावर तव मारताना दिसत आहेत.

वैष्णवीच्या आत्महत्येमुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत आहे.

तर दुसरीकडे निर्लज्ज राजेंद्र हगवणे आपल्या मित्रांसोबत मटणावर ताव मारत असतानाची दृश्य आता समोर आली आहेत.

लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाच थैमान, मांजरा नदीला पूरजन्य परिस्थिती

लातूर जिल्ह्यात मागच्या 8ते 9 दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळतो आहे....

त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या त मांजरा नदीसह रेना, तावरजा तेरणा, या नद्यांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली...

खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे...

तर आपत्ती व्यवस्थापन देखील सज्ज ठेवण्यात आल आहे.. 8बोटी आणि 6 पथक तैनात करण्यात आले आहेत...

लातूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असणाऱ्या मांजरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे...

लोहारा येथील घनकचरा प्रकल्प हटवावा या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी स्थगित

धाराशिवच्या लोहारा शहरातील घनकचरा प्रकल्पामुळे अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असुन हा प्रकल्प शासकीय धान्य गोदामाजवळ नगरपंचायतीने अनाधिकृत पणे उभारल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी नगर पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते अखेर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी समीती गटीत करुन तीन महीन्यात समीतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार प्रविण स्वामी यांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेतले.

भुईबावडा घाटात काल रात्री दरड कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळ होती ठप्प

कणकवली व वैभववाडी तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका वैभववाडीतील भुईबावडा घाटाला बसला. काल रात्री भुईबावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही वेळ हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता. दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी व बांधकाम कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरील दरड हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला. सध्या या घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

पोर्शे प्रकरणात आरोपी विशाल अगरवाल याचा जमीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

विशाल अगरवाल पोर्शे अपघातातील अल्पवयीन तरुणाचे वडील

विशाल अगरवाल याने सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता

पुणे पोलिसांनी केलेली अटक अवैध असल्याचे विशाल अगरवाल याने सुप्रीम कोर्टात सांगितले

शिवानी अगरवाल म्हणजेच विशाल अगरवाल च्या पत्नीला काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला होता

पत्नीला जामीन दिल्यानंतर आता पती विशाल ने सुद्धा सुप्रीम कोर्टात अर्ज केला मात्र तो सुप्रीम कोर्टाने फेटाळला

vaishnavi hagawane: वैष्णवी हगवणे आतुरता प्रकरणात एक मोठी अपडेट समोर

वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून पाहते अटक केली आहे. मागील आठ दिवसापासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. 17 मे ला या आरोपीनी तळेगाव या ठिकाणी का हॉटेलमध्ये त्यांचे काही मित्रांसोबत जेवण केलं होतं त्याची सीसीटीव्ही दृश्य देखील आता समोर आली आहेत. या दोन्ही फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा मोठा आव्हान पिंपरी चिंचवड शहर पोलिसांसमोर होतं. मात्र आज अखेर या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आला आहे.

Sindhudurg: मुसळधार पावसाचा महामार्गालगत असलेल्या घरांना फटका पावसाचे पाणी घरात घुसले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोगटेवाडी येथील घरांना बसला. सर्व्हिस रोडवर गटार नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी महामार्गालगतच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना या पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागला आहे.

अमरावतीच्या मेळघाटातील अतिदुर्गम भागातील ३८ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा आज मुक्काम

एक दिवस मेळघाट' साठी या उपक्रमांतर्गत हा मुक्काम असणार आहे...

जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता महापात्र ह्या कुटिदा गावात मुक्काम ठोकणार आहेत...

मेळघाटातील 38 गावांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो...

यातील कुटीदा, बिच्चुखेडा, रेट्याखेडा, कुही, बोराट्याखेडा, खडीमल, डोमी, चुनखडी, माडीझडप, रक्षा यासह विविध गावांचा संपर्क हा पावसाळ्यात तुटतो...

त्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून या गावांमध्ये आज मुक्काम ठोकून येथील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार....

आदिवासी नागरिकांसोबत अधिकाऱ्यांकडून संवाद साधला जाणार आहे...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाची आज किल्ले रायगडावर सांगता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा आज किल्ले रायगडावर समारोप होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदींसह प्रदेश राष्ट्रवादीचे पदाधिकारी हजर राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या दिना निमित्त राज्यभर ही यात्रा काढण्यात आली. आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून यात्रेची सांगता होईल.

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास बंदी

पाकिस्तान सोबतच्या युद्धानंतर देशांतर्गत सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे.

याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यात ड्रोन अथवा मानवरहित हवाई यंत्र याचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे.

3 जूनच्या दुपारी बारा वाजेपर्यंत बंदी कायम राहणार आहे.यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी हा आदेश जारी केला आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे.

अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी ड्रोन व मानरहित हवाई यंत्र उडवण्यास बंदी घातली आहे.

Bhandara Accident: भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, तुमसर-गोबरवाही मार्गावर भीषण अपघात

भंडारा जिल्ह्यातील तुमसर-गोबरवाही मार्गावरील टुमनी नाल्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात परसवाडा (दे.) येथील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते व्यापारी प्रविन खवास (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रविन खवास हे दुचाकी ने तुमसरहून गोबरवाहीकडे धान्य खरेदी करीता जात होते. दरम्यान, टुमनी नाल्याजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने प्रविन खवास यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, परिसरात काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.मृतक प्रविनच्या मृत्यू नंतर बाजार समितीतील सहकार्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

Raigad: किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 28 आणि 29 मे रोजी बंद राहणार

किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 28 आणि 29 मे रोजी पर्यटक, प्रवाशांसाठी बंद राहणार आहे.

पायरी मार्गालगत असलेल्या डोंगरकड्यांवरील दगड, दरडी मोकळ्या करण्याचे काम या दोन दिवसात प्रशासनाकडून केले जाणार आहे.

या कामात मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक सहकार्य करणार आहेत. येत्या 6 आणि 9 जून रोजी रायगडावर शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे.

यावेळी हजारो शिवभक्त पायरी मार्गाने रायगडावर येत असतात.

दोन वर्षांपूर्वी शिवराज्यभिषेक दिनी डोंगरावरील दगड अंगावर कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात आहे.

Ratnagiri Rain: रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्टचा ईशारा

तर 24 व 25 मे कालावधीत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह पाऊस पडेल

ताशी 50 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता...

नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.