LIVE: कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 40 बेडचा वॉर्ड उभारला
Webdunia Marathi May 24, 2025 03:45 PM

Maharashtra Marathi Breaking News Live Today : आता कोरोना पसरल्याच्या बातम्या पुन्हा तणाव वाढवत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे भारतातही दक्षता वाढविण्यात आली असून पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.

आता कोरोना पसरल्याच्या बातम्या पुन्हा तणाव वाढवत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे भारतातही दक्षता वाढविण्यात आली असून पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी घोषणा केली की त्यांचा पक्ष 22 जूनपासून हुंडाविरोधी आणि हिंसाचारमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी मोहीम सुरू करेल. पुण्यात नुकत्याच झालेल्या 26 वर्षीय महिलेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे आणि त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चा वापर विरोधकांविरुद्ध केल्याचा आरोप केला आहे..

वैष्णवी हगवणेने सासरच्या मंडळींच्या हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.