संघर्षातून घडलेला निष्ठावान व दृष्टा नेता : माऊली खंडागळे
esakal May 25, 2025 12:45 AM

संघर्षातून घडलेला दृष्टा नेता : माऊली खंडागळे

श्री ज्ञानेश्वर रावजी खंडागळे तथा माऊली हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेलं एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते सर्वांमध्ये अगदी मनमोकळेपणाने मिसळतात. विकास कामाच्या बाबतीत एक कार्यक्षम कार्यकर्ता म्हणून, त्यांची ओळख आहे. नियोजनबद्ध काम कसे करावे? हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. सतत हसतमुख असणारा हा नेता, त्यामुळेच तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. सर्वसामान्य माणसाच्या हाकेला प्रतिसाद देणारा हा आवाज आहे.संकटे व अडीअडचणीच्या वेळी धावून येणारा ते देवदूत वाटतात ते त्यांच्या सेवेतील तत्परतेमुळे.स्पष्टवक्तेपणा, हजरजबाबी, निर्भिडपणे व्यक्त होणारे व्यक्तिमत्त्व, सडेतोड व रोखठोकपणा ही त्यांच्या स्वभावातील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा आज वाढदिवस. त्यांच्या अभीष्टचिंतनाच्यानिमित्ताने त्यांच्या जीवनपटावरून टाकलेला हा दृष्टीक्षेप.
- डॉ. अनुष्का प्रवीण शिंदे, हिवरे तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर

अन्यायाचा प्रतिकार करताना माऊली खंडागळे वाणी तीव्र आणि तिखट होते. एरवी तसा हा माणूस गोड स्वभावाचा आहे आणि म्हणूनच त्यांची जनमानसामध्ये लोकप्रियता आजही टिकून आहे. डबक्यालाच आपले जग मानणाऱ्या कुपमंडूक वृत्तीला छेद देणारी माणसं विरळच असतात. मळलेल्या व रुळलेल्या रस्त्यांवरून अनेक जण वाटचाल करतात पण क्वचितच एखादा दुसरा आपली वाट स्वतः तयार करतो.अशीच स्वतःची वाट स्वतःच निर्माण करणाऱ्या माणसांपैकीच एक म्हणजे श्री. माऊली खंडागळे.

आपण समाजात अनेक प्रकारची माणसं पाहतो पण जिद्द चिकाटी संयम शांत मितभाषी, हजरजबाबी आणि अभ्यासू स्वभाव हे गुण असणारी माणसं अगदी बोटावर मोजावीत एवढीच असतात. यापैकीच एक म्हणजे जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी गावचे सुपुत्र माऊली खंडागळे.उत्तम नेतृत्व गुण, संघटन कौशल्य, प्रचंड संयम, विनम्रता, संवाद कौशल्य, उत्तम प्रशासक, अभ्यासू , चिकित्सक वृत्ती, पक्षावर असलेली निष्ठा आणि पक्षासोबत आजपर्यंत जपलेली एकनिष्ठता अशा बहुगुणांनी संपन्न असलेले व्यक्तिमत्व आणि जुन्नर तालुक्याच्या नेतृत्वाची क्षमता असलेले दृष्टा आणि सक्षम नेते म्हणजे माऊली खंडागळे होय.

प्रत्येक कुटुंबाशी आपुलकीची नाळ जोडलेला नेता
माऊली खंडागळे यांचा २५ मे रोजी जन्मदिवस. मांजरवाडीसारख्या ग्रामीण भागात एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली ही व्यक्ती तालुक्याचे नेतृत्व करण्यात सर्वार्थाने सक्षम आणि बहुगुणसंपन्न आहे. जुन्नर तालुक्यातील नव्हे तर आंबेगाव तालुक्यातील देखील प्रत्येक कुटुंबाशी आपुलकीची नाळ जोडलेली असलेला हा नेता नेहमीच आपला वाटतो. मांजरवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य ते जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊलींचा हा प्रवास थक्क करणारा आहे.

संघर्षाने व्यापलेली यशोगाथा
माऊली म्हणून ओळख असणाऱ्या एका ध्येयवेड्या शिवसैनिकाची आणि कार्यकर्त्यांना माऊलीच्या ममतेनं जपावं कसं ? आणि पक्ष संघटनेमध्ये अचूक जबाबदारी देऊन त्यांच्या पाठीवर थाप टाकणे हे फारच कमी लोकांना जमतं, पण हेच माऊलींना अगदी अचूकपणे केलंय. अनेक व्यक्तींच्या नावापुढे अनेक बिरुदं लावली जातात पण माऊली या शब्दाची गरिमा जपणारं एक साजेसं नाव म्हणजे ज्ञानेश्वर रावजी खंडागळे तथा माऊली खंडागळे होय. मांजरवाडी, जुन्नर तालुक्यातील नारायणगावपासून काही अंतरावर पूर्वेला असणारं हे छोटंसं गाव. खरं तर ती वाडीच. शेतकरी कुटुंबात २५ मे १९६८ रोजी जन्माला आलेल्या माऊलींची ही यशोगाथा खरंच संघषनि व्यापलेली आहे. वयाच्या २७ व्या वर्षी मांजरवाडीसारख्या गावाचे सरपंचपद भूषवणाऱ्या या तरुणाने समाजसेवेचा वसा मोठ्या जिद्दीने पुढे नेला.

संवेदनशील मन अन जनमत असलेलं व्यक्तिमत्त्व
दगडाला शेंदूर फसला की त्याला हात जोडून पाया पडणारी असंख्य लोकं आजही आहेत. विरोधकांच्या नजरेमध्ये दगड असलेल्या माऊलींनी कपाळावरच काय पण अंगभर भगव्या रंगाचा शेंदूर फासून नसानसात शिवसैनिक भिनवून ही उत्तुंग झेप घेतली आहे. एक उत्कृष्ट मित्र, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, राजकारणाची उत्तम जाण असलेला
उत्कृष्ट संवादकौशल्य, दांडगा जनसंपर्क असलेलं एक संवेदनशील मनाचा आणि चांगलं जनमत असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे माऊली अशी ओळख माऊलींनी संपूर्ण तालुक्यात निर्माण केली आहे. माऊली हे आपल्या कार्याची छाप सोडून आपली वेगळी ओळख जपण्यात निष्णात आहेत.
आपल्या गावात किंवा पंचक्रोशीतील कोणत्याही गावात सामुदायिक विवाह सोहळा असो, कोणाचा वाद असो, कोणी अडचणीत असो की कोणाला वैद्यकीय उपचारांची गरज असो, त्या त्या प्रत्येक ठिकाणी माऊली आवर्जून उपस्थित असतात. त्यांचे गोडवे गाताना किंवा लिहिताना मोबदला मिळण्याची किंचितही अपेक्षा नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि काम करण्याची जिद्द पाहून त्यांच्याबद्दल लिहून मन मोकळे केल्याशिवाय राहवत नाही. ‘कधी तरी आम्हाला ही वेळ द्या’, असे आवर्जून सांगणाऱ्या जयश्री वहिनींना मात्र माऊली ज्ञानेश्वर माऊलींचे उदाहरण देऊन सांगतात,

कोणे एके दिवशी पायाचा चाकर !
चालून जावे कोणे दिवशी !!
कोणे दिवशी होईल सद्गुरुची कृपा !
चुकती जन्माच्या खेपा !!

म्हणजेच कोणाला हत्तीवर बसण्याचा योग येईल तर कधी काय होईल, असे कधीही सांगता येणार नाही. शालूची आणि उपरण्याची गाठ लग्नमंडपात बांधली गेली. त्या गाठेसोबतच आपण सात जन्माच्या फेऱ्या घेतल्या तेव्हा हाच समाज होता ना? म्हणूनच या समाजाचं मी काही तरी देणं लागतो, हेच समजवताना जयश्री वहिनींचे डोळे मात्र पाणावल्याशिवाय राहत नाहीत.

शिवसेनाला बळकटी देण्याचा प्रयत्न...
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोण कोणासोबत आहे. कुठपर्यंत आहे, पुढे किती दिवस राहील? या गोष्टींविषयी कोणीही सांगू शकत नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वार्थासाठी वेळोवेळी पक्ष बदलून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत पण माऊली खंडागळे हे याला अपवाद आहेत. माऊली हे असे राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत की त्यांनी मागील कितीतरी दशके शिवसेनेचा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) भगवा खांद्यावर एकनिष्ठपणे घेऊन आजही शिवसेना बळकटी करणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी १९८५ पासून शिवसेनेशी जे नाते जोडले आहे ते आजही अबाधित आहे. यापेक्षा वेगळी निष्ठा आणि प्रामाणिकपणा काय असू शकतो ?

जुन्नरच्या नेतृत्वाची संधी मिळू दे...
माणसे जोडण्याचे अफाट कौशल्य, कार्यकर्ते जपण्याची कला आणि उत्तम संवादकौशल्य या अंगभूत गुणांमुळे माऊली हे आपली एक वेगळीच छाप सोडून जातात. या माणसाला रात्री - अपरात्री कधीही कधीही संपर्क साधा मदतीला हा माणूस कायमच धावून आलेला असतो. आपल्या जवळच्या आणि ओळखीच्या माणसांसाठी तर सगळेच धावून येतात पण अनोळखी माणसांना देखील मदत करण्याची भावना आहे, ती अंतर्मनातूनच यावी लागते, ती भावना माऊलींमध्ये नेहमीच पाहायला मिळते. असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या माऊलींना जुन्नर तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळू मिळो हीच जन्मदिवसाची शुभेच्छा !!!

17057, 17058, 17059

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.